पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

Posted On: 04 APR 2022 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. 

बेनेट यांना  कोविड-19 चे  निदान झाले असून  त्यांच्या तब्येतीत लवकर आराम पडावा यासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला.

युक्रेनमधील परिस्थितीसह अलीकडील भू-राजकीय घडामोडींवर उभय नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांचाही आढावा घेतला.

पंतप्रधानांनी,  बेनेट यांचे  नजीकच्या काळात भारत भेटीदरम्यान स्वागत करण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली. 

 

* * *

S.Kakade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813353) Visitor Counter : 185