आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या 24 तासांत 9,13 नव्या कोरोना रुग्णांची नोंद,715 दिवसांनंतर 1000 पेक्षा कमी रूग्णांची नोंद


दिवसभरात 10 पेक्षा कमी कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद

12 ते 14 वयोगटातील 1.86 कोटींहून अधिक बालकांचे लसीकरण

Posted On: 04 APR 2022 1:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2022

 

भारताने कोविड विरोधी लढ्यात महत्वपूर्ण टप्पा पार केला असून, सक्रीय रुग्णभार(12,597) सातत्याने कमी होत असून 714 दिवसांनंतर सध्या तो 13,000 पेक्षा  कमी झाला आहे. सक्रीय रुग्णभार देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतका आहे. 18 एप्रिल 2020 रोजी सक्रीय रुग्णभार 12,974 होता.

दुसरी  एक  महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करत, भारतात नव्या 913 रुग्णांची नोंद 715 दिवसांनंतर झाली असून ती 1000 च्या खाली आली आहे. 18 एप्रिल 2020 रोजी 991 रुग्णसंख्या होती.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,316 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,24,95,089 झाली आहे. दिवसभरात 10 पेक्षा कमी रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात एकूण 3,14,823  कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.10 (79,10,79,706) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.22% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.29% आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.70 (1,84,70,83,279)  कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,21,87,532 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 1.86 (1,86,39,260) कोटींपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक लस मात्रा दिल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403809

2nd Dose

10001647

Precaution Dose

4483046

FLWs

1st Dose

18413439

2nd Dose

17513757

Precaution Dose

6915586

Age Group 12-14 years

1st Dose

18639260

Age Group 15-18 years

1st Dose

57333277

2nd Dose

38548306

Age Group 18-44 years

1st Dose

554759695

2nd Dose

467231694

Age Group 45-59 years

1st Dose

202775699

2nd Dose

185636455

Over 60 years

1st Dose

126757912

2nd Dose

115626977

Precaution Dose

12042720

Precaution Dose

2,34,41,352

Total

1,84,70,83,279

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813127) Visitor Counter : 196