आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 183 कोटी 20 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरावयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 1.22 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घसरण होऊन आज देशात केवळ 16,187 रुग्ण कोविड सक्रीय; ही रुग्णसंख्या भारतातील एकूण कोविड बाधितांच्या केवळ 0.04%

गेल्या 24 तासांत देशात 1,421 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.75%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.27% आहे

Posted On: 27 MAR 2022 11:30AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 182 कोटी 20 लाखांचा (1,82,20,10,030) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,17,73,803 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 1.22 लाखांहून अधिक(1,22,01,065) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403472

2nd Dose

9996261

Precaution Dose

4421872

FLWs

1st Dose

18412797

2nd Dose

17501086

Precaution Dose

6793476

Age Group 12-14 years

1st Dose

12201065

Age Group 15-18 years

1st Dose

56814422

2nd Dose

37174113

Age Group 18-44 years

1st Dose

554278022

2nd Dose

463457530

Age Group 45-59 years

1st Dose

202690969

2nd Dose

184748950

Over 60 years

1st Dose

126697598

2nd Dose

115077930

Precaution Dose

11340467

Precaution Dose

2,25,55,815

Total

1,83,20,10,030

 

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 16,187 झाली आहेदेशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.04%  आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.75% आहे. गेल्या 24 तासांत 1,826 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,82,262 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 1,421 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 6,20,251 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 69 लाखांहून अधिक (78,69,22,965) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.27% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  0.23%.इतका नोंदला गेला आहे.

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1810167) Visitor Counter : 190