पंतप्रधान कार्यालय
जागतिक आरोग्य संघटनेचे, जागतिक पारंपरिक औषधी केंद्र स्थापन करण्याच्या करारावर आयुष मंत्रालयाने स्वाक्षरी केल्याचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2022 2:24PM by PIB Mumbai
जागतिक आरोग्य संघटनेच्या, जागतिक पारंपरिक औषधी केंद्राचे भारत हे महत्वाचे स्थान असल्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,व्यक्त केला आहे. हे केंद्र आपल्या ग्रहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी सहाय्य करेल आणि आपल्या समृद्ध पारंपारिक पद्धतींचा लाभ जगाला मिळवून देईल,अशी आशा यावेळी व्यक्त केली.
आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात असे केंद्र स्थापन करण्यासाठी यजमान पद स्विकारण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे.
आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले.
"पारंपारिक औषधांसाठी अत्याधुनिक असे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक केंद्र असणे हा भारताचा गौरव आहे. हे केंद्र आपल्या ग्रहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी सहाय्य करेल आणि आपल्या समृद्ध पारंपारिक पद्धतींचा लाभ जगाला मिळवून देण्यासाठी योगदान देईल."
"पारंपारिक औषधांसाठी अत्याधुनिक असे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक केंद्र भारत असणे हा भारताचा गौरव आहे. हे केंद्र आपल्या ग्रहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी सहाय्य करेल आणि आपल्या समृद्ध पारंपारिक पद्धतींचा लाभ जगाला मिळवून देण्यासाठी योगदान देईल."
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1809939)
आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam