दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रभावी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारताला मिळालेले यश अधोरेखित करण्यासाठी भारताचा दूरसंचार विभाग आणि राष्ट्रकुल दूरसंचार संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 18 MAR 2022 9:40AM by PIB Mumbai

राष्ट्रकुल दूरसंचार संघटनेच्या सदस्य देशांना परिवर्तनशील डिजिटल उपायांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने, प्रभावी माहिती आणि संप्रेषण  तंत्रज्ञानाचा  (आयसीटी ) अवलंब करून  भारताला मिळालेले यश प्रदर्शित करण्यासाठी आणि अधोरेखित  करण्यासाठी,भारत सरकारचा दूरसंचार विभाग आणि राष्ट्रकुल दूरसंचार संघटनेच्या वतीने ' डिजिटल परिवर्तन केंद्रस्थानी (डीटीसीएस ) - भारत' या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

 

या कार्यक्रमात  डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे महत्त्वपूर्ण घटक असलेल्या आधार (युनिक डिजिटल आयडेंटिफायर) आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय ) प्रणालीच्या यशोगाथा, राष्ट्रकुल दूरसंचार संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींसोबत सामायिक करण्यात आल्या . युआयडीएआयने आधारसंदर्भात सादरीकरण केले त्याचप्रमाणे  1.26 अब्ज लाइव्ह आधार, 68+ अब्ज प्रमाणीकरणे, आर्थिक समावेशात आधाराचे  पाठबळ , आधार-संलग्न थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी )आणि आधारचे अन्य उपयोग यांसारखी वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात आली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने  (एनपीसीआय ) ग्राहक, बँका, आर्थिक तंत्रज्ञान  आणि व्यापारी यांना फायदेशीर असलेल्या यूपीआय प्रणालीसंदर्भात सादरीकरण केले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या  4.52 अब्ज व्यवहार व्यवहारासह अन्य वापराबाबत यूपीआय प्रणालीची वैशिष्ट्ये अधोरेखित केली.

दूरसंचार विभागाने राष्ट्रकुल दूरसंचार संघटनेचे आणि सदस्य देशांचे आभार मानले;आणि नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी  करत असलेल्या यांसारख्या प्रयत्नांच्या अनुषंगाने,  या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी या देशांना  पाठबळ देण्याचा प्रस्ताव मांडला. या यशोगाथा सामायिक केल्याबद्दल राष्ट्रकुल दूरसंचार संघटनेने आणि सदस्य देशांनी भारताची प्रशंसा केली.

***

SP/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807138) Visitor Counter : 264