आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 180.97 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 9 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्येत 29,181 पर्यंत घट ;भारतातील आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.07%

गेल्या 24 तासात 2,528 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.73%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.40%

Posted On: 18 MAR 2022 9:11AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 180.97 कोटींहून अधिक (1,80,97,94,588) मात्रांचा टप्पा पार  केला आहे. 2,12,97,331 लसीकरण  सत्रांच्या माध्यमातून  हे साध्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून  12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 9 लाखांहून अधिक  (9,04,700)   किशोरवयीन मुलामुलींना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,944

2nd Dose

99,89,099

Precaution Dose

43,48,895

FLWs

1st Dose

1,84,11,999

2nd Dose

1,74,85,980

Precaution Dose

66,38,099

Age Group 12-14 years

1st Dose

9,04,700

Age Group 15-18 years

1st Dose

5,61,52,073

2nd Dose

3,52,82,337

Age Group 18-44 years

1st Dose

55,36,93,457

2nd Dose

45,87,11,316

Age Group 45-59 years

1st Dose

20,25,92,884

2nd Dose

18,35,69,127

Over 60 years

1st Dose

12,66,31,067

2nd Dose

11,43,36,409

Precaution Dose

1,06,44,202

Precaution Dose

2,16,31,196

Total

1,80,97,94,588

 

उपचाराधीन रुग्णसंख्येत घट होण्याचा कल कायम आहे,  उपचाराधीन रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ही रुग्णसंख्या   29,181  आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी  0.07% आहे.

 

परिणामी, भारताचा कोरोनामुक्तीचा  दर 98.73% इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,997 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,24,58,543 झाली आहे.

 

 गेल्या 24 तासात 2,528  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली

 

गेल्या 24 तासात एकूण 6,33,867 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.18 कोटी (78,18,58,171)  चाचण्या केल्या आहेत

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी  दरांमध्येही सातत्याने घसरण होत  आहे. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  0.40%आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील  0.40%. नोंदविण्यात आला आहे.

***

SP/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807130) Visitor Counter : 202