रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इतर देशात नोंदणी झालेल्या अव्यावसायिक किंवा खाजगी वाहने भारतात चालवण्यासाठी तसेच अशा वाहनांच्या भारतातील प्रवेशासाठी नियमावलीचा मसुदा जाहीर

Posted On: 17 MAR 2022 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2022

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खाजगी वाहनांसाठी आंतर- देशीय प्रवासासाठी नियमावलीचा मसुदा 16.03.2022 रोजी जारी केला आहे. इतर देशांमध्ये नोंदणी केलेली अव्यवसायिक किंवा खाजगी वाहनांना भारतात प्रवेश करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी हे नियम लागू आहेत. आंतरदेशीय वापरासाठीच्या अव्यावसायिक म्हणजेच खाजगी वाहनांना लागू असणाऱ्या नियमावलीनुसार भारतात असताना या वाहनांसोबत पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
(i) वैध नोंदणी प्रमाणपत्र
(ii)वैध चालक परवाना किंवा आंतरराष्ट्रीय चालक परवाना यापैकी जे लागू असेल ते
(iii)वैध विमा पॉलिसी
(iv)वाहन ज्या देशातले आहे, त्या देशात लागू असल्यास योग्य- वैध  प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी)

ही कागदपत्रे इंग्लिशऐवजी इतर भाषेत असतील तर इंग्लिश भाषेतील प्रत योग्य योग्य अधिकारी व्यक्तींकडून अक्षरांकित करून ती मूळ कागदपत्रांत बरोबरच ठेवावी.

इतर कुठल्याही देशात नोंदणी झालेली वाहने भारतात माणसांच्या वाहतुकीसाठी किंवा मालाची ने-आण करण्यासाठी वापरता येणार नाहीत.
कोणत्याही देशात नोंदणी झालेल्या वाहनाला भारताच्या मोटर वाहन कायदा 1988 घ्या कलम 118 मधील नियम आणि अटी पाळणे बंधनकारक आहे

राजपत्रातील सूचना बघण्यासाठी येथे क्लिक करा


S.Bedekar/V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806950)