आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

योग आणि पारंपरिक औषध क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्यासाठी भारत सुयोग्य स्थितीत - सर्बानंद सोनोवाल

Posted On: 13 MAR 2022 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2022

8 व्या  आंतरराष्ट्रीय योग दिवस  2022 साठी100 दिवसांच्या उलटमोजणी निमित्त , नवी दिल्ली येथे आयोजित योग महोत्सव 2022 चे उद्‌घाटन केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वर्षीची  आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ही मोहीम 21 जून 2022 पर्यंत  100 दिवस, जगभरातील 100 शहरे आणि 100 संस्था या संकल्पनेवर  लक्ष केंद्रित करेल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यात प्रथमच, 21 जून 2022 रोजी 75 वारसा स्थळांवर /प्रसिद्ध सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिके केली  जातील.  योग कार्यक्रम, योग प्रात्यक्षिके, कार्यशाळा, परिसंवाद यांचा समावेश असलेले इतर कार्यक्रम  केवळ  भारतातच नव्हे तर जगभरात आयोजित केले जातील.

डब्ल्यूएचओ  एम योग  ॲप , नमस्ते ॲप , वाय -ब्रेक  ॲप वापरण्याच्या फायद्यांबद्दल मंत्रालयाकडून  प्रसार केला जाईल. छायाचित्र स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चर्चा, प्रतिज्ञा, जनमत  सर्वेक्षण, जिंगल इत्यादींसह माय जीओव्ही मंचावर  विविध लोककेंद्रित उपक्रम आणि कार्यक्रम सुरू केले जातील.

जागतिकआरोग्य संघटनेचे  जागतिक पारंपरिक औषधे केंद्र  भारतात स्थापन होत असल्याने,  योग आणि पारंपारिक आरोग्य पद्धतींच्या सखोल ज्ञानाने सुसज्ज असलेल्या भारतावर या  माध्यमातून  जगाला शांतता, निरामयता , उत्तम आरोग्य आणि किफायतशीर  आरोग्य सुविधांच्या  मार्गावर नेण्याची जबाबदारी आहे,  असे सोनोवाल यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले.

 

 

 

 

 

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805578) Visitor Counter : 240