माहिती आणि प्रसारण मंत्रालय

5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे डीडी न्यूजवर थेट प्रसारण


थेट प्रत्यक्ष ठिकाणाहून त्या क्षणाची अद्यायावत माहिती

Posted On: 09 MAR 2022 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2022


नुकत्याच 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात सार्वजनिक प्रसारणकर्ता प्रसार भारतीच्या बातम्या प्रसारीत करणारे, डीडी न्यूज आणि आकाशवाणी वृत्तविभाग 10 मार्च 2022 रोजी अर्थात मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक मिनिटाची अद्यायावत माहिती देण्यासाठी सज्ज आहेत.

मतमोजणी संदर्भातली अचूक माहिती आणि तथ्य-तपासणी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर कार्यरत बातमीदार आणि स्ट्रिंगर्सच्या विस्तृत जाळ्याद्वारे, डीडी न्यूज तुम्हाला पाचही राज्यांमधून वास्तविक वेळेत सर्वात अचूक आकडेवारी देईल.  राजकीय तज्ञ आणि मतांसदर्भातील आकडेवारीचे तज्ञ (सेफोलॉजिस्ट) त्या आकडेवारीचे थेट विश्लेषण डीडी न्यूजच्या ‘जनादेश’ कार्यक्रमात सकाळी सात वाजल्यापासून करतील.

एक थेट प्रसारण होणारे माहितीचे केन्द्र, प्रत्यक्ष जागेवरुन बातमीदारी करणाऱ्या संघाच्या सामर्थ्याचा आणि त्यांच्या पोहोचचा लाभ घेत, प्रत्येक सेकंदाला डीडी न्यूजवरील अद्यायावत माहिती अधिक समृद्ध करेल.  5 राज्यांमधील मतमोजणी प्रत्येक केन्द्रांवर वाहिनीची उपस्थिती असेल. तिथून माहिती केन्द्राला थेट मतमोजणीची आकडेवारी पाठवली जाईल. त्याचे वास्तविक वेळेत एकत्रीकरण आणि विश्लेषण केले जाईल.  3D ग्राफिक्सचा आकर्षक रितीने वापर करत दर सेकंदाला अद्ययावत आघाडी आणि निकालांची थेट आकडेवारी प्रेक्षकांना बघता येईल. त्यातून निकालाचे एकूण चित्र त्यांच्यासाठी स्पष्ट होईल.

वाहिनीवरील रिपोर्ताजमधे प्रत्यक्ष जागेवरुन वार्तांकन,राजकीय विश्लेषक आणि राजकीय नेत्यांशी स्टुडिओमधील चर्चा यांचा समावेश असेल.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच निवडणुका झालेल्या राज्यात दूरदर्शनचे प्रादेशिक वृत्तविभाग देखील सकाळी 7 पासून दिवसभर ताज्या घडामोडींची माहिती आपल्या विशेष कार्यक्रमातून देणार आहेत.  या कार्यक्रमांमध्ये राज्यातील प्रख्यात राजकीय तज्ज्ञ आणि नेत्यांशी चर्चा करण्यासोबतच मतांची आघाडी आणि निकालांची थेट माहिती दिली जाईल.

आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओ न्यूज नेटवर्कने 10 मार्च रोजी मतमोजणीचे विश्वासार्ह आणि वास्तविक वेळेत अद्यायावत माहिती देण्यासाठी विस्तृत व्यवस्था देखील केली आहे. देशातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क असलेले आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ 10 मार्च रोजी सकाळी 7 पासून 9 तासांपेक्षा जास्त काळ निवडणुकीच्या निकालांवरील विशेष बातमीपत्र आणि कार्यक्रम प्रसारित करेल. हे कार्यक्रम एआयआर एफएम गोल्डवर 100.1 MHz, एफएम रेनबो नेटवर्क, विविध भारती आणि एआयआरच्या इतर स्थानिक वाहिन्यांवर प्रसारित केले जातील. हे प्रसारण आकाशवाणीच्या युच्यूब वाहिनीवरही थेट उपलब्ध असेल - https://www.youtube.com/NEWSONAIROFFICIAL

पाचही राज्यांतील आकाशवाणीचे बातमीदार मतमोजणीची अद्यायावत माहिती देतील.  स्टुडिओमधील तज्ञ निकालांचे सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण करतील.

विशेष निवडणूक बातमीपत्रा व्यतिरिक्त, सखोल थेट चर्चा संध्याकाळी 7:20 ते रात्री 8 पर्यंत प्रसारित केली जाईल.  5 राज्यांतील तज्ञांसह एक विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम रात्री 9:15 ते रात्री 10 या वेळेत प्रसारित केला जाईल.

देशभरातील आकाशवाणीचे सर्व 46 प्रादेशिक वृत्तविभाग आपापल्या राज्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये विशेष कार्यक्रम आणि बातमीपत्र प्रसारित करतील. एफएम गोल्ड, एफएम रेनबो, विविध भारती आणि आकाशवाणीच्या इतर स्थानिक वाहिन्यांसह विविध वाहिन्यांद्वारे देशभरात दर तासाला बातमीपत्र उपलब्ध असतील.

हे विशेष कार्यक्रम आणि मतांच्या आघाडी तसेच निकालांवरील वास्तविक वेळेतील अद्यायावत माहिती प्रसार भारतीच्या डिजिटल मंचावरही उपलब्ध असतील. यात न्यूजऑनएआयआर ॲप, टेलिग्राम वाहिनी आणि प्रसार भारती न्यूज सर्व्हिसेसचे ट्विटर हँडल तसेच दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या युट्यूब वाहिनीचाही समावेश आहे.

JPS/VG/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804336) Visitor Counter : 235