गृह मंत्रालय
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वित्तीय वर्ष 2021-22 ते 2025-26 साठी स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना (SSSY) सुरू ठेवण्यास दिली मान्यता
Posted On:
07 MAR 2022 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2022
स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना सुरू ठेवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री, श्री अमित शाह यांच्या अधिपत्याखालील गृह मंत्रालयाकडून प्राप्त झाला आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची सरकारची वचनबद्धता तो दर्शवतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एकूण 3,274.87 कोटी रुपये खर्चाची स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना (SSSY) आणि तिचे घटक 31.03.2021 नंतरही 2021-22 ते 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना सुरू ठेवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री, श्री अमित शाह यांच्या अधिपत्याखालील गृह मंत्रालयाकडून प्राप्त झाला आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची सरकारची वचनबद्धता तो दर्शवतो.
पार्श्वभूमी
स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पात्र व्यक्तींना स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले असून सध्या देशभरात या योजनेअंतर्गत 23,566 लाभार्थी समाविष्ट आहेत. निवृत्ती वेतनाची रक्कम वेळोवेळी सुधारित केली गेली आहे आणि 15.08.2016 पासून महागाई भत्ता देखील दिला गेला आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803618)