आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी 10 व्या जागतिक श्रवण दिन सोहळ्याला केले संबोधित


“श्रवण विकार, श्रवणविषयक आजारांचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार करणे याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि लोकचळवळ ही गुरुकिल्ली”

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिल्ली एम्सच्या नवजात शिशु श्रवण स्क्रिनिंग सुविधा, आणि म्हैसूरच्या एआयआयएसएच, 11 जनसंपर्क सेवा केन्द्र (ओएससी) यांचे आभासी माध्यमातून उद्घाटन

Posted On: 03 MAR 2022 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मार्च 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी श्रवण विकार आणि श्रवणदोष याबाबत समाजामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला. 

“लोकसहभाग आणि लोकचळवळीच्या मदतीने, श्रवण विकाराचे लवकर निदान आणि त्यावर वेळेवर उपचार करण्याबाबत प्रत्येकजण समाजातील सध्याच्या ज्ञानात भर घालण्यासाठी प्रभावीपणे योगदान देऊ शकतो” असे त्यांनी सांगितले.

 

निदान होऊ शकले नाही आणि उपचार केले नाहीत तर, श्रवणविषयक आजारांचे रूपांतर अपंगत्वात होऊ शकते. त्यामुळे अनेकांच्या उत्पादकता आणि जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो, असेही ते पुढे म्हणाले.  डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केन्द्र  येथे जागतिक श्रवण दिनाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.  या वर्षीच्या जागतिक श्रवण दिनाची संकल्पना "आयुष्यासाठी ऐका, काळजीपूर्वक ऐका" अशी आहे.

याबाबत जागरुकता निर्माण करण्यात आशा आणि एएनएम, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, परिचारिका यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.  त्यांनी श्रवणदोषांची लवकर तपासणी आणि निदान करण्यासाठी समाज आणि लहान मुलांच्या पालकांना अधिक शिक्षित करण्याचे आवाहन केले.  "आपण स्वत:च्या मनाने औषधोपचार करू नयेत,  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ऐकण्याच्या समस्यांशी संबंधित कोणतीही औषधे घेण्यापूर्वी योग्य खबरदारी घेतली पाहिजे." असे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात, मोठ्या आवाजाच्या संपर्कासहीत श्रवणहानी संबंधित जवळपास सर्व कारणे टाळता येतात आणि त्यावर उपचार करता येतात.  हे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर परीवर्तन ठरु शकतो, असेही ते म्हणाले.

  

केंद्रीय मंत्र्यांनी एम्स इथे नवजात श्रवणविषयक स्क्रीनिंग सुविधांचे आणि म्हैसूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (एआयआयएसच) इथे 11 जनसंपर्क सेवा केन्द्रांचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. नवजात, शाळेत जाणारे आणि प्रौढांसाठी गेल्या दोन वर्षांच्या स्क्रीनिंग अहवालासह त्यांनी लहान मुले आणि वृद्धांसाठी श्रवण आणि तपासणीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पुस्तकही जारी केले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, जागतिक श्रवण दिन आपल्याला श्रवणदोषांप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो.  गरोदर स्त्रिया आणि मातांनी या समस्येबद्दल जागरूक राहून श्रवणदोष असल्यास त्यांच्या मुलांवर लवकरात लवकर उपचार करावेत यावर त्यांनी भर दिला.

 

* * *

R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802660) Visitor Counter : 227