गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाला 1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत केली मंजूर


महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांना 2021 मध्ये आलेल्या पूर/भूस्खलनासाठी मिळणार निधी

Posted On: 03 MAR 2022 10:43AM by PIB Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत 2021 मध्ये पूर/भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या पाच राज्यांना आणि एका केंद्रशासित प्रदेशाला अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे. या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकांना मदत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा संकल्प यातून दिसून येतो.
उच्चस्तरीय समितीने एनडीआरएफ अंतर्गत पाच राज्यांना 1,664.25 कोटी आणि एका केंद्रशासित प्रदेशाला 17.86 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे. त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे:-


आंध्रप्रदेश 351.43 कोटी रुपये;

हिमाचल प्रदेश 112.19 कोटी रुपये;

कर्नाटक 492.39 कोटी रुपये;

महाराष्ट्र 355.39 कोटी रुपये;

तामिळनाडू 352.85 कोटी रुपये; आणि

केन्द्रशासित प्रदेश पुद्दुचेरी 17.86 कोटी रुपये.

 


ही अतिरिक्त मदत केंद्राने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकची आहे, जी राज्यांकडे आधीच उपलब्ध आहे. केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात 28 राज्यांना त्यांच्या एसडीआरएफमध्ये 17,747.20 कोटी रुपये आणि  8 राज्यांना एनडीआरएफ मधून 4,645.92 कोटी रुपये जारी केले आहेत.
केंद्र सरकारने या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपत्तीनंतर, त्यांच्याकडून मागणी प्राप्त होण्याची वाट न पाहता, आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथके (आयएमसीटीएस) नियुक्त केली होती.

***

ST/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802582) Visitor Counter : 186