आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 177.70 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासात 18 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.59%

गेल्या 24 तासात देशभरात 6,915 नवे कोविड रुग्ण आढळले

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली, 92,472 वर आली

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.11%

Posted On: 01 MAR 2022 9:36AM by PIB Mumbai

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 18 लाखांपेक्षा अधिक मात्रा (18,22,513) देण्यात आल्या असून , त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 177.70 कोटींच्या वर (1,77,70,25,914) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक  अहवालात म्हटले आहे.

एकूण 2,04,61,239 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,609

2nd Dose

99,67,857

Precaution Dose

41,81,766

FLWs

1st Dose

1,84,09,585

2nd Dose

1,74,43,514

Precaution Dose

62,37,068

Age Group 15-18 years

1st Dose

5,48,91,370

2nd Dose

2,79,76,062

Age Group 18-44 years

1st Dose

55,18,71,141

2nd Dose

44,47,22,943

Age Group 45-59 years

1st Dose

20,22,82,358

2nd Dose

18,02,64,366

Over 60 years

1st Dose

12,64,19,524

2nd Dose

11,22,80,434

Precaution Dose

96,76,317

Precaution Dose

2,00,95,151

Total

1,77,70,25,914

 

गेल्या 24 तासात,16,864 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,23,24,550 इतकी झाली आहे.

परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.59% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात 6915 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली 92,472 वर आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 0.22% आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 9,01,647 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 76.83 कोटींपेक्षा अधिक (76,83,82,993) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.11% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.77% इतका आहे.

***

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802014) Visitor Counter : 180