संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिटनमध्ये होणाऱ्या 'कोब्रा वॉरियर' या युद्धाभ्यासात भारतीय हवाई दल होणार सहभागी

Posted On: 23 FEB 2022 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2022

 

ब्रिटनमध्ये वॉडिंग्टन येथे 06 ते 27 मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या 'एक्स कोब्रा वॉरियर 22' या बहुराष्ट्रीय युद्धाभ्यासात भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे. वायुदलाचे तेजस हे वजनाने हलके लढाऊ विमान यामध्ये भाग घेणार असून ब्रिटनसह इतर काही देशांच्या वायुदलाची लढाऊ विमानेही या सरावात भाग घेणार आहेत.

सहभागी होणाऱ्या हवाई दलांना कार्यात्मक अनुभव मिळावा तसेच त्यासाठीच्या उत्तम कार्यपद्धतींची व तंत्रांची देवाणघेवाण करता यावी, जेणेकरून या देशांची लढाऊ क्षमता वाढेल आणि परस्परांमध्ये मैत्रीभाव निर्माण होण्यास मदत होईल, अशा एकत्रित उद्देशांनी याचे  आयोजन  करण्यात आले  आहे. 'तेजस' ची कार्यक्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची संधी आहे. 

या युद्धसरावासाठी 'तेजस' प्रकारची पाच विमाने ब्रिटनला रवाना होणार असून, या सरावाशी संबंधित अन्य वाहतुकीच्या कामांसाठी भारतीय वायुदलाचे सी-17 विमान उपयोगात आणले जाणार आहे.

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1800537) Visitor Counter : 161