संरक्षण मंत्रालय
‘विज्ञान सर्वत्र पूजयते’ मध्ये डीआरडीओचा सहभाग, देशभरातील 16 शहरांमध्ये प्रदर्शनांचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2022 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2022
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने देशभरात आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ मध्ये सहभागी होत आहे, ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ हा 22-28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत देशाच्या प्रत्येक भागातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रदर्शित करणारा देशव्यापी कार्यक्रम आहे.
डीआरडीओ, देशभरातील 16 शहरांमध्ये ‘अमृत महोत्सव विज्ञान प्रदर्शन: पथदर्शी आरखडा 2047’ या संकल्पनेवर प्रदर्शने आयोजित करत आहे. डीआरडीओद्वारे ज्या शहरांमध्ये ही भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शने आयोजित केली जात आहेत ती पुढीलप्रमाणे : आग्रा, अल्मोरा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, जोधपूर, लेह, मुंबई, म्हैसूर, पुणे, तेजपूर, एरनाकुलम, विजयवाडा आणि विशाखापट्टणम . 'महोत्सवा'मध्ये डीआरडीओचा सहभाग ही संशोधन आणि विकास संस्थांद्वारे केले जाणारे काम आणि 2047 च्या दिशेने वाटचाल करताना कल्पना आणि तंत्रज्ञानाचे प्रयत्न प्रदर्शित करण्याची संधी आहे.
विविध तंत्रज्ञानाशी संबंधित डीआरडीओची विविध उत्पादने यावेळी प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये नाग, मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल (एमपीएटीजीएम), आकाश, ब्रह्मोस, अस्त्र, प्रलय, मिशन शक्ती, आर्मर्ड इंजिनियर रिकॉनिसन्स व्हेईकल (एईआरव्ही), मारीच, थ्री डी सेंट्रल एक्विझिशन रडार (थ्रीडी कार), इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली , ब्रिज लेयर टँक (बीएलटी), इत्यादी. प्रदर्शित केले जाणारे तंत्रज्ञान म्हणजे रेट्रोमोटर, बूस्टर मोटर, कंपोझिट रॉकेट मोटर केसिंग, ड्रॉप टँक, ब्रेक डिस्क इ. यांचा यात समावेश आहे.
देशभरातील विविध केंद्रांवर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विभिन्न घडामोडींवर प्रख्यात शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांनी देखील हा सप्ताह साजरा केला जाईल. डीआरडीओचे शास्त्रज्ञ देशभरातील 33 केंद्रांवर 11 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये विविध संकल्पना आणि विषयांवर व्याख्याने देत आहेत.
‘अमृत महोत्सव विज्ञान’ अर्थात ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ संरक्षण, अवकाश, आरोग्य, कृषी, खगोलशास्त्र आणि इतर क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करणारा आपला वैज्ञानिक वारसा आणि तंत्रज्ञानाची ताकद प्रदर्शित करेल.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800349)
आगंतुक पटल : 245