कोळसा मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी 'भारतातील सर्वाधिक भरवशाचे सार्वजनिक क्षेत्र' पुरस्कार प्राप्त कोल इंडिया लिमिटेडची केली प्रशंसा
Posted On:
20 FEB 2022 8:01PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल)ला 'भारतातील सर्वाधिक भरवशाचे सार्वजनिक क्षेत्र' पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कौतुक केले आहे. जोशी यांनी एका ट्विटमध्ये याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा पुरस्कार ऊर्जा क्षेत्रातील जागतिक अग्रणी होण्याच्या सीआयएलच्या प्रयत्नांना अधिक प्रोत्साहन देईल, असे त्यांनी म्हटले आहे. प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार मिळविल्याबद्दल कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी देखील सीआयएलचे कौतुक केले आहे.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कोलकाता द्वारे “एनर्जी मीट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स फंक्शन” या कार्यक्रमात सीआयएलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799900)
Visitor Counter : 245