आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 175.03 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 36.28 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.21%

गेल्या 24 तासात 22,270 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 2,53,739

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.50%

Posted On: 19 FEB 2022 3:02PM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 36.28 लाखांहून अधिक (36,28,578)    मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 175.03 कोटी (1,75,03,86,834)  मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,98,09,200  लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,00,492

2nd Dose

99,49,833

Precaution Dose

40,22,962

FLWs

1st Dose

1,84,07,428

2nd Dose

1,74,11,477

Precaution Dose

57,83,690

Age Group 15-18 years

1st Dose

5,34,31,024

2nd Dose

2,06,81,828

Age Group 18-44 years

1st Dose

55,00,31,980

2nd Dose

43,42,94,627

Age Group 45-59 years

1st Dose

20,19,86,306

2nd Dose

17,80,23,333

Over 60 years

1st Dose

12,61,61,897

2nd Dose

11,09,06,468

Precaution Dose

88,93,489

Precaution Dose

1,87,00,141

Total

1,75,03,86,834

 

गेल्या 24 तासांत 60,298 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,20,37,536 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.21%.इतका आहे.

गेल्या 24 तासात 22,270  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 2,53,739 आहे. देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.59% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण  12,35,471 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 75.42 कोटींपेक्षा जास्त  (75,81,27,480)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.50% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील  1.80% नोंदविण्यात आला आहे.

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799605) Visitor Counter : 193