पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 अंतर्गत प्लास्टिक पॅकेजिंगबाबत विस्तारित उत्पादक उत्तरदायित्व मार्गदर्शक तत्वे सरकारकडून अधिसूचित


यामुळे प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्याची चक्रीय अर्थव्यवस्था बळकट होईल आणि शाश्वत प्लास्टिक पॅकेजिंगकडे वळण्यासाठी उद्योगांना मार्गदर्शक आराखडा प्रदान करेल : भूपेंद्र यादव

Posted On: 18 FEB 2022 9:23AM by PIB Mumbai

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 अंतर्गत  पॅकेजिंगबाबत विस्तारित उत्पादक उत्तरदायीत्व मार्गदर्शक तत्वे  अधिसूचित केली  आहेत.1 जुलै 2022 पासून, कमी उपयुक्तता आणि जास्त कचरा निर्माण करण्याची  क्षमता असलेल्या म्हणून निश्चित केलेल्या एकदाच  वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या प्रतिबंधासह, विस्तारित उत्पादक उत्तरदायीत्व  मार्गदर्शक तत्वे हे देशातील प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

 

एका ट्विट संदेशात, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र  यादव यांनी यासंदर्भातील घडामोडींची  माहिती देताना सांगितले की, मार्गदर्शक तत्त्वे प्लास्टिकसाठी  नवीन पर्याय विकसित करण्यासाठी  प्रोत्साहन देतील आणि शाश्वत प्लास्टिक पॅकेजिंगच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उद्योजकांना  मार्गदर्शक आराखडा प्रदान  प्रदान करतील.

 

ही मार्गदर्शक तत्वे  प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्याची चक्रीय अर्थव्यवस्था बळकट  करण्याच्या दृष्टीने ,प्लास्टिकसाठी  नवीन पर्याय विकसित करण्याच्या अनुषंगाने  प्रोत्साहन देण्यासाठी आणि  शाश्वत प्लास्टिक पॅकेजिंगकडे वळण्यासाठी  उद्योगांना    करण्यासाठी आराखडा  प्रदान करतात.पॅकेजिंगसाठी नवीन प्लास्टिक सामग्रीचा वापर कमी करण्यासाठी,जुन्या  प्लास्टिक पॅकेजिंग सामग्रीचा पुनर्वापर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अनिवार्य करण्यात आला आहे.

 

पुनर्वापर   केलेल्या प्लास्टिक सामग्रीच्या वापरासह विस्तारित उत्पादक उत्तरदायीत्व अंतर्गत (ईपीआर ) संकलित केलेलया  प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्याच्या पुनर्वापराच्या किमान स्तराची अंमलबजावणी करण्यासाठीच्या नियमांमुळे, प्लास्टिकचा वापर कमी होईल  आणि प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्याच्या पुनर्वापराला मदत मिळेल.

 

विस्तारित उत्पादक उत्तरदायित्व  मार्गदर्शक तत्त्वे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन क्षेत्राचे  औपचारिकीकरण आणि पुढील विकासाला चालना देईल.सर्वात महत्वाचे म्हणजे, अतिरिक्त  विस्तारित उत्पादक उत्तरदायित्व  प्रमाणपत्रे विक्री आणि खरेदीसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे  परवानगी देतात ,अशा प्रकारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी बाजारपेठेची यंत्रणा उभारली जाईल.

 

विस्तारित उत्पादक उत्तरदायित्व अंमलबजावणी ही यासाठी तयार करण्यात आलेल्या  ऑनलाइन मंचाद्वारे केली जाईल ,हा मंच या प्रणालीचा डिजिटल कणा म्हणून काम करेल.  हा ऑनलाइन मंच  विस्तारित उत्पादक उत्तरदायित्वाचा मागोवा घेण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी  अनुमती देईल आणि ऑनलाइन नोंदणी आणि वार्षिक विवरणपत्र भरणाऱ्या  कंपन्यांचे अनुपालन ओझे कमी करेल.विस्तारित उत्पादक उत्तरदायित्वाच्या  पूर्ततेवर देखरेख सुनिश्चित करण्यासाठी, या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उद्योगांची पडताळणी आणि लेखापरीक्षण करण्याची एक प्रणाली विहित केली आहे.

 

पर्यावरणीय गुणवत्तेचे  संरक्षण आणि सुधारणा करण्याच्या आणि पर्यावरण प्रदूषण रोखणे, नियंत्रित करणे आणि कमी करण्याच्या उद्देशाने उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालकांद्वारे विस्तारित उत्पादक उत्तरदायित्वाच्या उद्दिष्टांची  पूर्तता न करण्याच्या संदर्भात,'पोल्युटर पे' म्हणजेच प्रदूषण करून पर्यावरणाचे हानी करणाऱ्या घटकांनी  त्याचा खर्च उचलणे, या तत्वांवर  आधारित पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारण्यासाठी एक आराखडा ही मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करतात. संकलित केलेला निधी हा   संकलित  न केलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा  पर्यावरणपूरक संकलन, पुनर्वापर आणि  विल्हेवाटीसाठी उपयोगात आणला जाईल.

 

या अंतर्गत प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्याचे घनकचऱ्यामध्ये मिश्रण रोखण्यासाठी, उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालक ठेव परतावा प्रणाली  किंवा पुन्हा खरेदी (बाय बॅक) किंवा यांसारख्या इतर कोणत्याही  योजना राबवू शकतात.

***

Jaydevi PS/ Sonal C

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1799214) Visitor Counter : 1163