पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
17 FEB 2022 10:02AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शक्य ती सर्व मदत स्थानिक प्रशासनाकडून पुरवण्यात येत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथली दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी शोक संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन शक्य ती सर्व मदत पुरवत आहे."
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798957)
Visitor Counter : 217
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam