रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
वाहन मागोवा प्रणाली उपकरणासाठी मसुदा अधिसूचना जारी
Posted On:
16 FEB 2022 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, आर्गॉन, नायट्रोजन, ऑक्सिजन सारखे वायू वाहून नेणारी वाहने तसेच धोकादायक किंवा घातक स्वरूपाच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि राष्ट्रीय परवाना कक्षेत नसलेल्या वाहनांमध्ये वाहन मागोवा प्रणाली (वेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम ) उपकरण बसवण्यात आलेले नाही.
त्यानुसार, रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 15 फेब्रुवारी 2022 रोजी मसुदा अधिसूचनेद्वारे प्रस्तावित केले आहे की कोणताही धोकादायक किंवा घातक स्वरूपाचा माल वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनात वाहन उद्योग मानक (AIS) 140 नुसार वाहन मागोवा प्रणाली उपकरण बसवलेले असावे.
तीस दिवसांच्या कालावधीत संबंधितांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
राजपत्र अधिसूचनेसाठी लिंकवर क्लिक करा
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798751)
Visitor Counter : 258