नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
“ आजादी का अमृतमहोत्सव” चा एक भाग म्हणून नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय “न्यू फ्रंटियर्स” कार्यक्रमाचे आयोजन करणार
उर्जा आणि एमएनआरई मंत्री विद्यार्थी आणि विद्वानांशी संवाद साधणार
उर्जाविषयक वचनबद्धतेचे संकल्प सादर करणाऱ्या आघाडीच्या उद्योजकांचा सत्कार करणार
नवीकरणीय उर्जेच्या विविध पैलूंसंदर्भात उर्जा मंत्रालय वेबिनार, चर्चासत्रे आणि विचारमंथन बैठकांचे आयोजन करणार
Posted On:
15 FEB 2022 10:27AM by PIB Mumbai
“ आजादी का अमृतमहोत्सव” सोहळ्याचा एक भाग म्हणून नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय नवीकरणीय उर्जेसंदर्भात “न्यू फ्रंटियर्स” या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे . 16 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान हा कार्यक्रम आयोजित होणार आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून “ उर्जा संक्रमणामध्ये भारताचे नेतृत्व” या विषयावर उद्या 16 फेब्रुवारी रोजी विज्ञान भवनात प्रत्यक्ष उपस्थितीचा एक परिसंवाद होणार आहे. केंद्रीय उर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आर के सिंग आणि नूतन आणि नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यावेळी विशेष मार्गदर्शन करतील. यावेळी उर्जाविषयक उपक्रमांच्या प्रमुख वैशिष्ट्यांसह “नागरिक केंद्रित उर्जा संक्रमण- भारताची गाथा” यावरील एक व्हिडिओ यावेळी सादर करण्यात येईल.
त्यानंतर केंद्रीय उर्जामंत्री आर के सिंग आणि विद्यार्थी आणि या क्षेत्रातील विचारवंतांसोबत एक प्रश्नोत्तराचे सत्र होणार आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या ज्या उद्योजकांनी आपले उर्जा संकल्प सादर केले आहेत त्यांचा सत्कार केला जाणार आहे . या सत्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून एका उर्जा संकल्प पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल.
17 फेब्रुवारी 2022 रोजी मंत्रालयाने मुख्यत्वे नवीकरणीय उर्जा क्षेत्रात महिलांचा सहभाग- कृतीचे आवाहन, आयएसएची उर्जा संक्रमणात भूमिका आणि स्वच्छ तंत्रज्ञान स्टार्ट अप्स आणि हवामान क्षेत्रातील उद्योजक यांची भूमिका या विषयावरील तीन वेबिनारचे आयोजन केले आहे.
18 फेब्रुवारी 2022 रोजी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी 2070 पर्यंत “शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचा आराखडा” या विषयावर विचारमंथन करणाऱ्या बैठकीचे आभासी मंचाच्या माध्यमातून आयोजन केले आहे.
***
Jaydevi PS/ SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798463)
Visitor Counter : 324