गृह मंत्रालय

प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडून दुःख व्यक्त


स्वरमाधुर्य आणि संगीत यांचे दुसरे नाव म्हणजे लता दीदी यांनी त्यांच्या अतिशय मधुर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने प्रत्येक पिढीच्या जीवनात आनंद फुलवला, केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातही त्यांच्या आवाजाची मोहिनी

लता दीदींकडून मला वेळोवेळी मिळालेला स्नेह आणि जिव्हाळा यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो

त्यांची अतुलनीय देशभक्ती, मृदू आणि मधुर वाणी यांनी त्या नेहमीच आपल्यात राहतील, त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांप्रती मी दुःख व्यक्त करतो

Posted On: 06 FEB 2022 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. लता दीदी यांनी त्यांच्या अतिशय मधुर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने प्रत्येक पिढीच्या जीवनात आनंद फुलवला. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातही त्यांच्या आवाजाची मोहिनी  होती, असे अमित शाह यांनी ट्वीट केले आहे. संगीत विश्वात त्यांच्या योगदानाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही, त्यांचे निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. लता दीदींकडून मला वेळोवेळी मिळालेला स्नेह आणि जिव्हाळा यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. त्यांची अतुलनीय देशभक्ती, मृदू आणि मधुर वाणी यांनी  त्या नेहमीच आपल्यात राहतील, असे ते म्हणाले.  त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांरप्रती  मी दुःख व्यक्त करत आहे, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795938) Visitor Counter : 218