आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड  -19: गैरसमज  आणि  वस्तुस्थिती


लसीच्या दोन्ही मात्रा न घेतलेल्या  लाभार्थींची  दोन्ही मात्रांचे  लसीकरण झाल्याची नोंद होत असल्याचा  दावा करणारी  प्रसारमाध्यमांची वृत्त  चुकीची, निराधार आणि दिशाभूल करणारी

जगातील सर्वात मोठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम एक सक्षम डिजिटल पोर्टल-  कोविन द्वारे राबवली जात असून फसवणुकीला  प्रतिबंध करण्यासाठी  विशेष प्रमाणित कार्यप्रणाली आणि वैशिष्ट्ये कोविन मध्ये समाविष्ट

लसीकरण लाभार्थ्यांना कोविन वरील त्यांच्या नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्याचे अधिकार

Posted On: 03 FEB 2022 5:08PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये "लसीकरण फसवणूक" अशा  मथळ्याखाली  आरोप करणारी वृत्त प्रसारित झाली आहेत आणि या वृत्तांमध्ये लसीच्या दोन्ही मात्रा न घेतलेल्या लाभार्थींची दोन्ही मात्रांचे  लसीकरण झाल्याची नोंद करून फसवणूक केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. लसीकरणाच्या 'आकड्यांमध्ये फेरफार' केली जात असल्याचा आरोपही या वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

असे स्पष्ट करण्यात येत आहे की, अशा प्रकारची प्रसारमाध्यमांची वृत्त  केवळ दिशाभूल करणारीच  नाहीत तर ती  पूर्णपणे तथ्यहीन आणि निराधार  आहेत.

सदर वृत्ताचा मथळाच दिशाभूल करणारा आहे. को-विन यंत्रणेमध्ये  लसीकरण कार्यक्रम माहिती ही आरोग्य कर्मचारी स्वत: प्रविष्ट करतात, हे कदाचित लेखकांना माहित नसेल. माहिती प्रविष्ट करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांनी अनियमिततेचा आरोप केल्याचा दावा हे सूचित करतो की, लेखकांना को -विन  वर लसीकरण कार्यक्रम नोंदणीच्या प्रक्रियेची कोणतीही समज नाही.,

भारताची देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम ही जागतिक स्तरावरील अशाप्रकारची सर्वात मोठी मोहीम आहे.या मोहिमेला को -विन डिजिटल मंचाद्वारे  प्रदान केलेल्या मजबूत तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे.  या पोर्टलने कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या गेल्या एक वर्षांहून अधिक कालावधीत  लक्षणीय  कामगिरी केली आहे.या डिजिटल  मंचावर सगळ्या कोविड लसीकरणाची नोंद केली जाते.

को -विन  प्रणाली हा  सर्वसमावेशक मंच /प्रणाली असून  ही प्रणाली  देशभरातील मोबाइल आणि इंटरनेटच्या उपलब्धतेच्या मर्यादा आणि आव्हाने लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.कोणत्याही भौतिक, डिजिटल किंवा सामाजिक-आर्थिक अडथळ्यांमुळे उपेक्षित न राहता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ,को-विनमध्ये नोंदणी करण्यासाठी  आवश्यक वैशिष्ट्ये आणि लवचिकता समाविष्ट करण्यात आली आहेत.

त्याचवेळी, लसीकरणाच्या वेळी फसवणूक आणि/किंवा चुकीची माहिती प्रविष्ट करणे टाळण्यासाठी खालीलप्रमाणे विशेष प्रमाणित कार्यप्रणाली आणि वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत:

अ)  प्रत्येक लसीकरण चमूकडे  एक सत्यापनकर्ता असतो , लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची ओळख स्थापित  करणे हा त्याचा  एकमेव उद्देश असतो

ब)  को -विन मध्ये लाभार्थीचे लसीकरण झाले अशी नोंद होण्यापूर्वी  लसीकरण प्रक्रियेत खालील टप्पे  आहेत

i. वेळापत्रक - हे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष लसीकरण स्थळी असू शकते

ii.   पडताळणी करणे - केवळ लसीकरण नियोजित असलेले लाभार्थी (ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष लसीकरण स्थळी) पडताळणीच्या पुढील टप्प्यावर जातात जेथे सत्यापनकर्ता कोविनमध्ये प्रविष्ट केलेल्या तपशीलांनुसार लाभार्थीची ओळख स्थापित करतो. 

iii. लसीकरण - सत्यापनकर्ता /लसीकरणकर्त्याने यशस्वी पडताळणी केली असेल तरच लाभार्थी लसीकरण झाले म्हणून चिन्हांकित केला जातो.

क) लसीकरणस्थळी प्रत्यक्ष  नोंदणी आणि प्रथम मात्रेच्या  लसीकरणासाठी

i. पहिल्या लसीकरण मात्रेसासाठी  किंवा  लसीकरण स्थळी प्रत्यक्ष  नोंदणीसाठी आलेल्या कोणत्याही लाभार्थीच्या पडताळणीच्या वेळी सत्यापनकर्ता/लसीकरणकर्त्याने लाभार्थ्याने प्रदान केलेल्या मोबाइल क्रमांकावर  पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

ii. आधार प्रदान केले असल्यास आधार आधारित प्रमाणीकरण करण्याचा पर्याय आहे.

iii. जर इतर छायाचित्र असलेली ओळखपत्रे  प्रदान केली  असतील तर सत्यापनकर्ता /  लसीकरणकर्त्याकडे  छायाचित्र  ओळखपत्र पुराव्याचे  छायाचित्र घेण्याचा पर्याय आहे.

ड) लसीकरण स्थळी दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणासाठी -

i.  नाव, लाभार्थीचे  ओळखपत्र (केवळ कोविन वरून निर्माण  केलेले ), लाभार्थ्याने प्रदान केलेल्या तपशिलानुसार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून सत्यापनकर्ता /  लसीकरणकर्ता लाभार्थीची पडताळणी  करू शकतो

ii. यशस्वी पडताळणीनंतर, लाभार्थ्याने फक्त लाभार्थी डॅशबोर्डवर आणि लाभार्थींना पाठवलेल्या एसएमएसवर उपलब्ध असलेले  तिचे/त्याचे जन्म वर्ष आणि गुप्त कोड  प्रदान करणे आवश्यक आहे.

ई) खालील प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्याला एसएमएस द्वारे सूचना पाठविण्यात येत आहे:

i. ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष नोंदणी करते वेळी,

ii. लसीची दुसरी मात्रा अथवा प्रीकॉशन मात्रा घेण्याच्या तारखेविषयी माहिती देण्यासाठी

iii) लसीकरण झाल्यानंतर त्याची पुष्टी करण्यासाठी

iv) लसीकरण करणे शक्य नसल्यास त्याच्या कारणाविषयी माहिती देण्यासाठी

ही सर्व वैशिष्ट्ये लस प्रक्रियेची पडताळणी करणाऱ्या अथवा लस देणाऱ्या कर्मचाऱ्याला, लाभार्थ्याचे लसीकरण झाल्याची नोंद करण्याआधी पडताळणी प्रक्रियेच्या वेळी लाभार्थ्याची ओळख निश्चिती करण्याची क्षमता प्रदान करतात. या सर्व खबरदारीनंतर देखील, लसीकरण करणाऱ्या पथकाचे प्रमाणित परिचालन प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे माहिती भरताना तसेच नोंदणी करताना चूक झाल्याच्या घटना घडू शकतात आणि त्यामुळे लस न घेताच लाभार्थ्याला लसीकरण झाल्याची नोंद होते. कोविन पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी एसएमएस द्वारे संपर्क साधणाऱ्या प्रणालीमुळे, तक्रार निवारण यंत्रणेद्वारे अशा घटनांची लगेचच नोंद होते. अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, संबंधित लसीकरण पथक आणि ज्या ठिकाणी अशा घटना घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत ते कोविड लसीकरण केंद्र यांचे तपशील पुढील दुरुस्तीविषयक आवश्यक कार्यवाही करण्यासाठी  संबंधित राज्य सरकारी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येतात.

त्याचबरोबर, लाभार्थ्यांना देखील कोविन पोर्टलवरील त्यांच्या नोंदींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. लाभार्थ्याच्या डॅशबोर्डवरील  रेझ एन इश्यूअर्थात   मुद्दा लक्षात आणून द्या या मॉड्यूलचा वापर करून लाभार्थी, नाव,वय,लिंग आणि ओळख पटविणारे छायाचित्र असलेले कार्ड यासारख्या मुलभूत लोकसंख्याशास्त्रीय तपशीलांखेरीज खालील बाबतीत सुधारणा करू शकतात:  

i) लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर दोन प्रमाणपत्रांचे एकाच प्रमाणपत्रात विलीनीकरण

ii)  माझे कोविन खाते या शीर्षकाखाली अनोळखी सदस्याने नोंदणी केल्याची घटना निदर्शनास आणणे

iii) संपूर्ण लसीकरण ते अंशतः लसीकरण आणि अंशतः लसीकरण ते लसीकरण न झालेले अशा स्वरुपात लसीकरण स्थितीची नोंद मागे घेता येणे

निर्देशित माध्यम अहवालामध्ये भारत सरकारच्या निवेदनाचे संक्षिप्त रूप सादर करण्यात आले आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, ते संक्षिप्त निवेदन खालीलप्रमाणे आहे:

 या निवेदनाद्वारे भारत सरकारने, प्रत्येक लसीकरण पथकासोबत सत्यापनकर्ता कार्यरत असतो आणि लसीकरण होत असलेल्या व्यक्तींची ओळख निश्चिती करणे हेच त्याचे काम असते असे म्हटले असून लसीकरणाच्या बाबतीत कोणताही घोटाळा फेटाळून लावला आहे. कोविन यंत्रणा हा समावेशक मंच असून देशभरात मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा यांच्या उपलब्धतेविषयी असणारी आव्हाने आणि मर्यादा लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. असे सरकारने सांगितले आहे. सरकार पुढे सांगते, प्रत्येक पात्र व्यक्तीला कोणत्याही प्रत्यक्ष, डिजिटल अथवा सामाजिक आर्थिक अडथळ्याविना लसीकरणाच्या प्रक्रियेत प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक वैशिष्ट्ये आणि लवचिकता कोविन पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, लसीकरण करताना फसवी अथवा चुकीची माहिती भरली जाणे टाळण्यासाठी या पोर्टलवर एसओपी म्हणजेच प्रमाणित परिचालन प्रक्रिया आणि इतर संबंधित वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहेत. 

अत्यंत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून देखील भारताने देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविला आणि आतापर्यंत नागरिकांना लसीच्या 167 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या असून देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 76% नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत ही बाब प्रशंसेला पात्र आहे.

***

S.Thakur/N.Chitale/S.Chavan/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795110) Visitor Counter : 317