अर्थ मंत्रालय
एअर इंडियाच्या मालकीचे धोरणात्मक हस्तांतरण पूर्ण
नीलांचल इस्पात निगम लिमिटेडसाठी धोरणात्मक भागीदार निवडला
एलआयसीची समभाग विक्री लवकरच
राष्ट्रीय पायाभूत सुविधा निधी पुरवठा आणि विकास बँक तसेच राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी यांच्या कामकाजाला सुरवात
बंद होणाऱ्या कंपन्यांच्या यासंदर्भातल्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट ( C-PACE)ची स्थापना होणार
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2022 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
नव्या सार्वजनिक क्षेत्र आस्थापना धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने, एअर इंडियाच्या मालकीचे धोरणात्मक हस्तांतरण पूर्ण झाल्याचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 2022-23 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करताना त्या आज बोलत होत्या.
एनआयएनएल, नीलांचल इस्पात निगम लिमिटेडसाठी धोरणात्मक भागीदाराची निवड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एलआयसीची समभाग विक्री लवकरच अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय पायाभूत सुविधा निधी पुरवठा आणि विकास बँक, नॅबफीड तसेच राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी यांच्या कामकाजाला सुरवात झाल्याचे त्यांनी सांगितले. बंद होणाऱ्या कंपन्याच्या या संदर्भातल्या प्रक्रियेला गती आणि नव्या कंपन्यांच्या नोंदणीला वेग देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित अनेक प्रणाली स्थापन करण्यात आल्या आहेत. स्वेच्छेने बंद होणाऱ्या अशा कंपन्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी री- इंजियनीरिंग प्रक्रियेसह सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट ( C- PACE) ची स्थापना होणार आहे. यामुळे यासाठीचा सध्याचा दोन वर्षाचा कालावधी 6 महिन्यापर्यंत कमी होणार आहे.
नादारी आणि दिवाळखोरी संहिता
नादारी आणि दिवाळखोरी संहितेत आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचेही वित्त मंत्र्यानी सांगितले.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1794527)
आगंतुक पटल : 452