अर्थ मंत्रालय
'आरोग्य आणि शिक्षण यावरील उपकर' यांना व्यवसाय खर्च म्हणून स्विकारले जाणार नाही
विशिष्ट सरकारी कल्याणकारी योजनांच्या निधीसाठी करदात्यांवर अतिरिक्त शुल्क म्हणून आरोग्य आणि शिक्षण उपकर लावला जातो
Posted On:
01 FEB 2022 3:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
'आरोग्य आणि शिक्षण उपकर' हा व्यवसाय खर्च म्हणून समजला जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना हे स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले, की आयकर हा व्यवसायाच्या उत्पन्नातील खर्च म्हणून स्वीकारला जाणार नाही. यामध्ये कर आणि अधिभार यांचाही समावेश आहे.
'आरोग्य आणि शिक्षण उपकर' हा करदात्यांवर विशिष्ट सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांना निधी देण्यासाठी अतिरिक्त अधिभार म्हणून लादला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही न्यायालयांनी ‘आरोग्य आणि शिक्षण उपकर’ यांना व्यवसाय खर्च म्हणून परवानगी दिली आहे, जे कायद्याच्या हेतूच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन, 'उत्पन्न आणि नफ्यावरील कोणताही अधिभार किंवा उपकर हा व्यवसाय खर्च म्हणून गणला जाणार नाही, याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1794242)
Read this release in:
English
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Urdu
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam