PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2022 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 27 जानेवारी  2022

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  22 लाखाहून जास्त (22,35,267) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 163.84 कोटीहून अधिक (1,63,84,39,207) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,78,47,482 सत्रांद्वारे या  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 3,06,357 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,76,77,328 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 93.33% झाला आहे.

गेल्या 24 तासात 2,86,384 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  22,02,472 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 5.46% आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,62,261 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.21 कोटीहून अधिक  (72,21,66,248 ) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 17.75% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 19.59% आहे.

इतर अपडेट्स :

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1793032) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati