पंतप्रधान कार्यालय
भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे मानले आभार
Posted On:
26 JAN 2022 9:54PM by PIB Mumbai
भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
नेपाळच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान शेरबहादुर देवबा, तुम्ही दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आपण आपल्या अनेक वर्षांच्या दृढ आणि शाश्वत मैत्रीला बळ देण्यासाठी एकत्र काम करत राहू."
भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल भूतान, पंतप्रधान आपणांस धन्यवाद. भारताच्या भूतानसोबतच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि चिरस्थायी मैत्रीला अतिशय महत्त्व आहे. ताशी डेलेक, भूतान सरकार आणि भूतानमधील जनता यांचे संबंध अधिकाधिक दृढ होवोत."
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"धन्यवाद, पंतप्रधान राजपक्षे. हे वर्ष विशेष आहे, कारण आपले दोन्ही देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा प्रवास साजरा करत आहोत. आपल्या जनतेमधील संबंध देखील वर्धिष्णू होवोत."
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद, पंतप्रधान नफ्ताली बेनेट. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या आपल्या बैठकीचे मला स्मरण झाले. मला विश्वास आहे, की भारत-इस्त्रायल रणनैतिक भागीदारी संबंध तुमच्या दूरगामी दृष्टीकोनाने समृद्ध होत राहील."
***
MaheshC/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792934)
Visitor Counter : 257
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam