पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रामधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून मदतीची घोषणा

प्रविष्टि तिथि: 25 JAN 2022 10:56AM by PIB Mumbai

महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (पीएमएनआरएफ) मदतीची घोषणाही केली आहे.
आपल्या ट्वीटर संदेशांमधे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;
"महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi
पंतप्रधान @narendramodi यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची  तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

***

SonalTupe/Vinayak

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1792465) आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam