गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2022


गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (संस्थात्मक श्रेणी) आणि प्राध्यापक विनोद शर्मा (वैयक्तिक श्रेणी) यांची यावर्षीच्या सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी निवड

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज संध्याकाळी आयोजित समारंभात 2019, 2020 आणि 2021 वर्षासाठीच्या पुरस्कार विजेत्यांबरोबरच त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल

Posted On: 23 JAN 2022 9:06AM by PIB Mumbai

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशातील व्यक्ती आणि संस्थांचे  अमूल्य योगदान आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करण्यासाठी, केंद्र सरकारने सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार नावाने वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो. संस्थेला 51 लाख रुपये रोख  आणि प्रमाणपत्र तर व्यक्तींना 5 लाख रुपये रोख  आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावर्षी या पुरस्कारासाठी 1जुलै, 2021 पासून नामांकने मागवण्यात आली होती. 2022 च्या पुरस्कार योजनेला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. पुरस्कार योजनेला प्रतिसाद रूपाने संस्था आणि व्यक्तींकडून 243 वैध नामांकन प्राप्त झाली.

 

वर्ष 2022 साठी, (i) गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (संस्थात्मक श्रेणी) आणि (ii) प्राध्यापक विनोद शर्मा (वैयक्तिक श्रेणी) यांची आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील 2022 पुरस्कार विजेत्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सारांश खालीलप्रमाणे -

गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (GIDM) -  2012 मध्ये स्थापन गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (GIDM) ही संस्था गुजरातची आपत्तीचा धोका  कमी करण्याची (DRR) क्षमता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. धोरणात्मक दृष्ट्या तयार केलेल्या क्षमता निर्मिती  कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट संस्थेने 12,000 हून अधिक व्यावसायिकांना महामारी दरम्यान विविध धोक्यांचे  व्यवस्थापन आणि ते रोखण्यासंबंधी विविध समस्यांवर प्रशिक्षण दिले आहे. अलिकडच्या काही  प्रमुख उपक्रमांमध्ये वापरण्यास -अनुकूल गुजरात अग्निसुरक्षा अनुपालन पोर्टलचा विकास तसेच एकात्मिक रोग देखरेख  प्रकल्पाअंतर्गत कोविड-19 च्या देखरेख प्रयत्नांना पूरक म्हणून मोबाइल अॅप तंत्रज्ञानावर आधारित प्रगत कोविड -19 देखरेख (ACSyS) प्रणालीचा विकास यांचा समावेश आहे.

प्रा. विनोद शर्मा -  भारतीय लोक प्रशासन संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक आणि सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष प्रा. विनोद शर्मा हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संस्थापक समन्वयक होते, जी आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था म्हणून ओळखली जाते. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी हा मुद्दा राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अग्रस्थानी आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले आहेत. देशात आपत्ती जोखीम कमी करण्यामधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. ते लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी इतर सर्व प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांसाठी (ATIs) महत्वपूर्ण व्यक्ती आहेत. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नांना जोडण्यासाठी पंचायत स्तरावरील सज्जता नियोजन करून डीआरआर लागू करण्याच्या बाबतीत सिक्कीमला एक आदर्श राज्य बनवले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज संध्याकाळी आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019, 2020 आणि 2021 वर्षांसाठी पुरस्कार दिले जाणार असून तेव्हाच त्यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

***

SonalTupe/SushmaKane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791929) Visitor Counter : 1125