पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 22 जानेवारीला विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार


देशाचा कोणताही भाग विकासाच्या मार्गापासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या मार्गदर्शनाअंतर्गत हा उपक्रम

या संवादाचा उद्देश मिशन मोडमध्ये जिल्हा स्तरावर शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना पोहचवणे हा आहे

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2022 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022


पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यातील सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबाबत पंतप्रधान थेट अभिप्राय जाणून घेतील. या संवादामुळे कामगिरीचा आढावा आणि उदभवणाऱ्या आव्हानांचे मूल्यमापन करण्यात मदत होईल.

जिल्ह्य़ातील विविध विभागांद्वारे मिशन मोडमध्ये, सर्व संबंधितांच्या समन्वयाने विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकारने देशभरात वाढ करण्यासाठी आणि विकासातील विषमता दूर करण्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलली आहेत.  सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेशी अनुरूप हा संवाद आहे

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1791668) आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam