पंतप्रधान कार्यालय
महान कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
17 JAN 2022 9:50AM by PIB Mumbai
कथक नृत्यशैलीचे महान नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बिरजू महाराज यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान म्हणतात,
"भारतीय नृत्यकलेला साऱ्या जगात विशेष ओळख मिळवून देणारे आदरणीय पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने अतिशय दुःख होत आहे. त्यांचे देहावसान ही संपूर्ण कलाजगतासाठी कदापि भरून न येणारी हानी आहे. या शोकप्रद प्रसंगी त्यांचे आप्तस्वकीय आणि त्यांचे प्रशंसक यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांतिः ।"
***
ST/JW/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790429)
Visitor Counter : 315
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam