मंत्रिमंडळ

भारत आणि तुर्कमेनिस्तान यांच्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत सहकार्याच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 JAN 2022 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी देण्यात आली.

या सामंजस्य कराराद्वारे एक अशी प्रणाली स्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्याद्वारे भारत आणि तुर्कमेनिस्तान या दोन्ही देशांना एकमेकांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा फायदा होईल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सज्जता, प्रतिसाद आणि क्षमता निर्माण करणारी क्षेत्रे अधिक बळकट होण्यास मदत होईल.

या सामंजस्य करारामुळे, खालील क्षेत्रांत दोन्ही देशांना फायदेशीर असं सहकार्य होणे अपेक्षित आहे.

i.आपत्कालीन परिस्थितींवर देखरेख आणि अंदाज आणि त्यांच्या परिणामांचे मूल्यांकन

ii.आपत्ती व्यवस्थापनात सहभाग असलेल्या योग्य संस्थांमधील सक्षम अधिकाऱ्यांमार्फत परस्पर संवाद;

iii.संशोधन प्रकल्पांचे संयुक्त नियोजन, विकास आणि अंमलबजावणी, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रकाशनांची देवाणघेवाण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन कार्यांचे परिणाम;

iv.या सामंजस्य कराराअंतर्गत, परस्पर सहमतीनुसार माहिती, नियतकालिके किंवा इतर कोणतीही प्रकाशने, व्हिडिओ आणि फोटो सामग्री तसेच तंत्रज्ञानाची देवाणघेवाण

v.संयुक्त परिषदा, परिसंवाद, कार्यशाळा तसेच संबंधित क्षेत्रातील सराव आणि प्रशिक्षणांचे आयोजन;

vi.आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञ आणि अनुभवांची देवाणघेवाण;

vii.शोध आणि बचाव कार्यासाठी प्रथम प्रतिसाद देणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवणे; आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षणार्थी आणि तज्ञांची देवाणघेवाण करणे:

viii.तांत्रिक सुविधा आणि उपकरणे प्रदान करण्यासाठी, पूर्व ईशारा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनातील पक्षांची क्षमता वाढविण्यासाठी परस्पर सहमतीनुसार सहाय्य प्रदान करणे;

ix.आपत्कालीन स्थितीत प्रतिसाद देतांना, परस्पर सहकार्याने एकमेकांना सहकार्य करणे.

x.आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ज्ञान आणि कौशल्याचे परस्पर आदानप्रदान

xi.आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या मानकांनुसार परस्पर सहमतीने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली सादर करणे;

xii.आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित इतर कोणतेही उपक्रम, ज्यांच्या अंमलबाजावणीबाबत सक्षम प्राधिकरण किंवा पक्षांनी परस्पर सहमती दर्शविली असेल;

आतापर्यंत भारताने स्वित्झर्लंड, रशियन, सार्क, जर्मनी, जपान, ताजिकिस्तान, मंगोलिया, बांगलादेश आणि इटली या देशांसोबत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासाठी द्विपक्षीय/बहुपक्षीय करार/सामंजस्य करार/इरादापत्राची संयुक्त घोषणा/सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788104) Visitor Counter : 240