मंत्रिमंडळ
सीमाशुल्क संबंधित बाबींमध्ये सहकार्य आणि परस्पर सहाय्य यासंदर्भातील भारत आणि स्पेन यांच्यातील कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2022 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि स्पेन दरम्यानच्या सीमाशुल्क बाबींमध्ये सहकार्य आणि परस्पर सहाय्य संदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे.
फायदे :
सीमाशुल्क संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या आणि तपास करण्याच्या अनुषंगाने तसेच यासंबंधित गुन्हेगारांना पकडण्यासाठी विश्वासार्ह, जलद आणि किफायतशीर माहिती आणि गुप्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.
हा करार उभय देशांच्या सीमाशुल्क अधिकार्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करेल आणि सीमाशुल्क कायद्यांची योग्य अंमलबजावणी आणि सीमाशुल्क संबंधित गुन्ह्यांचा शोध आणि तपास तसेच कायदेशीर व्यापार सुलभ करण्यासाठी मदत करेल.
या करारामध्ये खालील तरतुदींचा समावेश आहे. :
I.सीमा शुल्काचे योग्य मूल्यमापन, विशेषत: सीमाशुल्क मूल्य, दर वर्गीकरण आणि दोन देशांमधील व्यापार केलेल्या वस्तूंचे मूळ ठरवण्याशी संबंधित माहिती;
II.विनंती करणाऱ्या प्राधिकरणाकडे; सादर केलेल्या घोषणापत्राच्या समर्थनार्थ तयार केलेल्या कोणत्याही दस्तऐवजाची पडताळणी (जसे की मूळ प्रमाणपत्र, पावत्या इ.)
III.खालील वस्तूंच्या बेकायदेशीर आयात निर्यातीसाठी सीमाशुल्क संबंधित गुन्हा:
a. शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि स्फोटक साधने
b. महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, पुरातत्व आणि सांस्कृतिक मूल्य असलेल्या कलात्मक आणि पुरातन वस्तू
c. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक विषारी पदार्थ आणि अन्य पदार्थ;
d. मोठ्या प्रमाणावर सीमाशुल्क किंवा करांच्या अधीन असलेल्या वस्तू;
e. सीमाशुल्क कायद्याच्या विरोधात सीमाशुल्क संबंधित गुन्ह्यांसाठी नवीन माध्यम आणि पद्धतींचा वापर
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1788099)
आगंतुक पटल : 309
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam