युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून कार्यान्वयनाचे नवे प्रोटोकॉल (SOPs) जारी
Posted On:
06 JAN 2022 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022
देशात, कोविड रुग्णसंख्या, विशेषतः ओमायक्रॉन स्वरूपाच्या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, हा संसर्ग रोखण्यासाठी साई- म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नव्या प्रमाणित कार्यान्वयन सूचना –एसओपी जाहीर केल्या आहेत. देशातील विविध क्रीडा उत्कृष्टता केंद्रात तसेच अनेक ठिकाणी सुरु असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरातया नव्या नियमांचे कठोरपणे पालन केले जाणार आहे.
प्रशिक्षण शिबिरात पोहोचल्यानंतर सर्व खेळाडूंना रॅपिड अँटीजेन चाचणी करणे अनिवार्य ठरणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तरिही, त्यांना पुढचे सहा दिवस स्वतंत्र प्रशिक्षण आणि भोजन घ्यावे लागेल. त्यानंतर पाचव्या दिवशी पुन्हा एकदा रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. पाचव्या दिवशी ज्यांची चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांचे नियमित प्रशिक्षण सुरु राहील. जर कोणाची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल, आणि त्यानंतर अलगीकरणात त्यांच्यावर उपचार केले जातील.
कोविड पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी योग्य त्या अलगीकरण सुविधा सर्व शिबिरस्थळी करण्यात आल्या असून त्या रोज दोनदा सॅनिटाईज केल्या जाणार आहेत. तसेच तिथे मायक्रो बायो बबल असून, त्यात, खेळाडूंची छोट्या छोट्या गटात विभागणी करुन, त्यांना स्वतंत्र प्रशिक्षण आणि भोजन घ्यावे लागेल. खेळाडूंना परस्परांशी संपर्क ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
त्याशिवाय, खेळाडूंची, प्रशिक्षक, सहायक कर्मचारी आणि अनिवासी- कर्मचारी अशा सर्वांच्या 15 दिवसांतून एकदा, अचानक कोविड चाचण्याही केल्या जातील. राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच, साईने शिफारस केलेल्या स्पर्धांमधेच खेळाडूंनी सहभागी व्हावे, अशीही शिफारस करण्यात आली आहे. आमंत्रणावरुन असलेल्या स्पर्धा आणि बिगर-ऑलिंपिक पात्रता स्पर्धांसाठीच्या शिफारसी, NCOE च्या संबंधित प्रादेशिक संचालकांकडून करण्यात येतील.
संबंधित राज्य सरकारांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना साईच्या एसओपी पेक्षा अधिक महत्वाच्या असतील, याचीही नोंद घेतली जावी.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788050)