अर्थ मंत्रालय
महसुली तूट भरुन काढण्यासाठी 17 राज्यांना केंद्राकडून 9,871 कोटी रुपये निधी वितरित
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यांना महसुली तूट भरुन काढण्यासाठी 98,710 कोटी रूपये निधी वितरित
Posted On:
06 JAN 2022 2:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज मासिक पीडीआरडी, म्हणजेच कराच्या हस्तांतरणानंतरची महसूली तूट भरुन काढण्यासाठी म्हणून 17 राज्यांना 9,871 कोटी रुपये निधी वितरित केला आहे. पीडीआरडी अंतर्गत राज्यांना देण्यात येत असलेल्या रकमेचा हा दहावा हप्ता आहे.
आतापर्यंत, पात्र राज्यांना, पीडीआरडी अंतर्गत, चालू आर्थिक वर्षात 98,710 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. हया महिन्यात वितरित करण्यात आलेल्या निधीची तसेच पीडीआरडी अंतर्गत 2021-22 या वर्षात राज्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या निधीची राज्यनिहाय माहिती सोबत जोडली आहे.
राज्यघटनेच्या कलम 275 अंतर्गत, राज्यांना पीडीआरडी –म्हणजेच कर हस्तांतरणानंतरची महसूली तूट भरुन काढण्यासाठीचा निधी दिला जातो. कर हस्तांतरणानंतर, राज्यांना महसूलीउत्पन्नात निर्माण झालेली दरी भरुन काढण्यासाठी, पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार हा निधी दिला जात आहे. आयोगाने 17 राज्यांना हा निधी देण्याची शिफारस केली होती.
यासाठी पात्र असलेल्या राज्ये आणि कोणत्या राज्यांना किती रक्कम दिली जावी, याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रत्येक राज्याची महसूली तूट आणि त्यांचे खर्च लक्षात घेऊन, तसेच केंद्राकडे करांचे हस्तांतरण किती होईल, याचा अंदाज बांधून 2021-22 या वर्षासाठी ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगाने, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण पीडीएआरडी पोटी 17 राज्यांना 1,18,452 कोटी रुपये निधी देण्याची शिफारस केली आहे.
यापैकी, 98,710 कोटी रुपये (83.33%) निधी देण्यात आला आहे. ज्या राज्यांना हा निधी देण्याची शिफारस आयोगाने केली आहे, ती राज्ये म्हणजे : आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशी आहे.
राज्य निहाय पीडीआरडी निधी वितरित (रक्कम- कोटींमध्ये)
S.No.
|
Name of State
|
Amount released in January 2022
(10th installment)
|
Total amount released in 2021-22
|
1
|
Andhra Pradesh
|
1438.08
|
14380.83
|
2
|
Assam
|
531.33
|
5313.33
|
3
|
Haryana
|
11.00
|
110.00
|
4
|
Himachal Pradesh
|
854.08
|
8540.83
|
5
|
Karnataka
|
135.92
|
1359.17
|
6
|
Kerala
|
1657.58
|
16575.83
|
7
|
Manipur
|
210.33
|
2103.33
|
8
|
Meghalaya
|
106.58
|
1065.83
|
9
|
Mizoram
|
149.17
|
1491.67
|
10
|
Nagaland
|
379.75
|
3797.50
|
11
|
Punjab
|
840.08
|
8400.83
|
12
|
Rajasthan
|
823.17
|
8231.67
|
13
|
Sikkim
|
56.50
|
565.00
|
14
|
Tamil Nadu
|
183.67
|
1836.67
|
15
|
Tripura
|
378.83
|
3788.33
|
16
|
Uttarakhand
|
647.67
|
6476.67
|
17
|
West Bengal
|
1467.25
|
14672.50
|
|
Total
|
9871.00
|
98710.00
|
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787983)
Visitor Counter : 233