पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते 7 जानेवारी रोजी कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे उद्घाटन होणार
हे संकुल विशेषत: देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागातील कर्करोगाच्या रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सुविधा प्रदान करेल
देशभरात आरोग्य सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या अनुरूप
Posted On:
06 JAN 2022 11:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (सीएनसीआय) दुसऱ्या संकुलाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करतील.
देशाच्या सर्व भागांमध्ये आरोग्य सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे दुसरे संकुल उभारण्यात आले आहे. चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेवर कर्करोगाच्या रुग्णांचा मोठा भार पडत होता त्यामुळे याच्या विस्ताराची गरज काही काळापासून जाणवत होती. ही गरज दुसऱ्या संकुलाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.
चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे दुसरे संकुल 530 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे 400 कोटी रुपये केंद्र सरकारने आणि उर्वरित पश्चिम बंगाल सरकारने 75:25 च्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. हे संकुल कर्करोगाचे निदान, कर्करोगाचा स्तर, उपचार आणि देखभाल यासाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह 460 खाटांचा सर्वसमावेशक कर्करोग केंद्र विभाग आहे. हे संकुल न्यूक्लियर मेडिसिन (पीईटी), 3.0 टेस्ला एमआरआय, 128 स्लाइस सीटी स्कॅनर, रेडिओन्यूक्लाइड थेरपी युनिट, एंडोस्कोपी सूट, आधुनिक ब्रेकीथेरपी युनिट इत्यादी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे संकुल एक अत्याधुनिक कर्करोग संशोधन सुविधा म्हणून देखील काम करेल आणि कर्करोगाच्या रुग्णांना विशेषत: देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागातील कर्करोग रुग्णांना सर्वसमावेशक देखभाल आणि उपचार प्रदान करेल.
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787967)
Visitor Counter : 228
Read this release in:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada