आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 147.72 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
गेल्या 24 तासात लसीच्या 96 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.01%
गेल्या 24 तासात 58,097 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 2,14,004
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.60%
Posted On:
05 JAN 2022 10:12AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 96 लाखांहून अधिक (96,43,238) मात्रा देऊन भारतातील कोविड-19 लसीकरण व्याप्तीने 147.72 कोटी (147,72,08,846) मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,58,21,510 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
HCWs
|
1st Dose
|
1,03,88,424
|
2nd Dose
|
97,24,352
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,86,432
|
2nd Dose
|
1,69,24,656
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
85,11,766
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
50,52,85,581
|
2nd Dose
|
34,12,84,803
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
19,52,45,545
|
2nd Dose
|
15,31,22,132
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,18,11,698
|
2nd Dose
|
9,65,23,457
|
Total
|
1,47,72,08,846
|
गेल्या 24 तासांत 15,389 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 3,43,21,803 झाली आहे.
परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.01%.इतका आहे.
गेल्या 24 तासात 58,097 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.
भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 2,14,004 आहे.देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.61% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 13,88,647 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 68.38 कोटींपेक्षा जास्त (68,38,17,242) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.60% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 4.18%.नोंदविण्यात आला आहे.
***
MC/Sonal/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787605)
Visitor Counter : 182