अर्थ मंत्रालय
जीएसटी परिषदेच्या 46व्या बैठकीतील शिफारशी
वस्त्रोद्योग क्षेत्रातील विद्यमान जीएसटी दर 1 जानेवारी 2022 नंतर सुरू राहणार
Posted On:
31 DEC 2021 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2021
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 46वी बैठक झाली. जीएसटी परिषदेच्या 45व्या बैठकीत घेण्यात आलेला, वस्त्रोद्योग क्षेत्रातील जीएसटी दरात बदल करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शिफारस जीएसटी परिषदेने केली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात सध्या लागू असलेले जीएसटी दर एक जानेवारी 2022 नंतर पुढे सुरू राहणार आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786592)
Visitor Counter : 316