माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात डिजिटल सहकार्यविषयक भागीदारीबाबतच्या इरादापत्रावर स्वाक्षऱ्या


दोन्ही देशांना परस्पर सहकार्य करून दोघांचाही विकास साधता येईल अशा अनेक गोष्टी आहेत: अनुराग ठाकूर



Posted On: 16 DEC 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि व्हिएतनामचे माहिती आणि दळणवळण मंत्री गुएंग मन हंग यांनी आज डिजिटल माध्यमाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या भागीदारीबाबत इरादापात्रावर सह्या केल्या. यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातली भागीदारी अधिक मजबूत होईल.

या इरादापात्राचा उद्देश, माहिती आणि अनुभवांची देवाणघेवाण करून डिजिटल माध्यमे आणि समाज माध्यमांसाठी धोरणात्मक आणि नियामक आराखडा तयार करून दोन्ही देशांतील माध्यम क्षेत्रातील व्यावसायिकांचा आणि अधिकाऱ्यांचा क्षमता विकास आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे हा आहे.

ठाकूर यांच्या निवासस्थानी या दोन्ही मंत्र्यांमध्ये झालेल्या सौहार्दपूर्ण चर्चेतून भारत आणि व्हिएतनामच्या मैत्रीपूर्ण संबंधांचे दर्शन झाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी सांगितले की, नुकत्याच भारताच्या राष्ट्रपतींच्या आणि पंतप्रधानांच्या व्हिएतनाम भेटीने दोन्ही देशांतील दृढ बंध, अधिकच मजबूत झाले आहेत आणि आजच्या बैठकीनंतर नवीन तंत्रज्ञान आणि ‘इन्फोडेमीक’, ज्यामुळे कोविड - 19 महामारीत सर्वच देशांसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती, या सारखी आव्हानं पेलण्यास  द्विराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत होतील. ठाकूर यांनी त्यांच्या व्हिएतनामी समकक्षांना फेब्रुवारी 2021 सरकार राबवीत असलेल्या डिजिटल मध्यमांसाठीच्या ‘नैतिक मूल्य संहिते’ बद्दल माहिती दिली.

हंग यांनी ठाकूर यांना व्हिएतनामला भेट देण्याचे निमंत्रण दिले आणि दोन्ही देशांतील पत्रकारांना एकमेकांच्या देशांतील सामाजिक-आर्थिक घडामोडींबद्दल माहिती मिळवून, यशोगाथा आणि परस्पर मजबूत संबंध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करावी असेही सुचविले.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पतीपत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक जयदीप भटनागर आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय तसेच भारत आणि व्हिएतनामचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यावर्षी भारत आणि व्हिएतनाम दरम्यानच्या ‘सर्वंकष सामरिक भागीदारीला’पाच वर्ष पूर्ण होत आहेत तसेच 2022 मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना पन्नास वर्षे पूर्ण होतील.

 

 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1782278) Visitor Counter : 277