पंतप्रधान कार्यालय
गीताजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2021 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीताजयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी गीता या विषयावर नुकतीच केलेली दोन भाषणेदेखील त्यांनी या प्रसंगी सर्वांसाठी सामायिक केली आहेत.
ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
काही दिवसापूर्वी गीता या विषयावर मी केलेली दोन भाषणे आजच्या गीताजयंतीनिमित्त सर्वांसाठी सामायिक करत आहे:
स्वामी चिद्भवानंद यांनी लिहिलेल्या भगवद गीतेच्या ई-पुस्तक स्वरूपातील पुस्तकाचे अनावरण.
गीतेसंबंधी विविध विद्वानांनी लिहिलेल्या हस्तलिखितांचे त्यावरील भाष्यासह अनावरण.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दन:।
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्।।
गीताजयंती निमित्त शुभेच्छा.
गीता म्हणजे जीवनाच्या अनेक पैलूंबाबत व्यावहारिक मार्गदर्शन करणारा ग्रंथ, गीतेची शिकवण संपूर्ण विश्वात प्रतिध्वनित होते आहे हे पाहणे अत्यंत आनंददायी आहे.”
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1781325)
आगंतुक पटल : 276
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam