पंतप्रधान कार्यालय

संविधान सभेच्या पहिल्या ऐतिहासिक बैठकीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी संविधान सभेतील तत्कालीन प्रख्यात दिग्गजांना वाहिली आदरांजली

Posted On: 09 DEC 2021 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2021

स्वतंत्र भारतातील संविधान सभेच्या पहिल्या ऐतिहासिक बैठकीला 75 वर्षे झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेतील तत्कालीन प्रख्यात दिग्गज व्यक्तिमत्वांना आदरांजली वाहिली आहे.

ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपल्या संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. भारताच्या विविध भागांतून, प्रतिष्ठित, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले आणि अगदी वेगवगळ्या विचारसरणी असलेले देखील लोक भारतासाठी सुयोग्य ठरेल अशी राज्यघटना प्रदान करण्यासाठी या दिवशी एकत्र आले होते. या महान व्यक्तिमत्वांना माझी आदरांजली.

संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची पहिली बैठक झाली.

आचार्य कृपलानी यांनी सभागृहाला त्यांची ओळख करून दिली आणि त्यांना अध्यक्षपद ग्रहण करण्याची विनंती केली.

आपल्या संविधान सभेच्या पहिल्या ऐतिहासिक बैठकीला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने मी माझ्या युवा मित्रांना या आदरणीय व्यक्तींच्या मेळाव्यातील घडामोडींविषयी आणि या संविधान सभेचा भाग असलेल्या तत्कालीन थोर व्यक्तिमत्वांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा आग्रह करीन. यामुळे, आपल्याला बौद्धिकदृष्ट्या अधिक समृद्ध करणारा अनुभव मिळेल.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779672) Visitor Counter : 231