आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
06 DEC 2021 9:16AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 127 कोटी 93 लाख मात्रा देण्यात आल्या
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 98,416; गेल्या 552 दिवसांतील सर्वात कमी संख्या
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.28% आहे; मार्च 2020 पासून सर्वात कमी
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.35%
गेल्या 24 तासात 8,834 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,40,69,608
गेल्या 24 तासात 8,306 नवीन रुग्णांची नोंद झाली
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.94%) गेले 63 दिवस 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.78%) गेले 22 दिवस % पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 64.82 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778343)
Visitor Counter : 195