सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनी राष्ट्रपती दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रदान करणार राष्ट्रीय पुरस्कार
व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्य/जिल्हा इत्यादींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्रदान केले जातील
Posted On:
02 DEC 2021 5:37PM by PIB Mumbai
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे 3 डिसेंबर 2021 रोजी 'आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनी’ नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कृतज्ञता सोहोळ्यात राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे असतील. राष्ट्रपती श्री कोविंद हे व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्य/जिल्हा इत्यादींना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि दिव्यांगजनांच्या (PwDs) सक्षमीकरणासाठी कार्य केल्याबद्दल वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले, श्री ए. नारायणस्वामी आणि श्रीमती प्रतिमा भौमिक देखील या कार्यक्रमात उपस्थित असतील.
दरवर्षी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि कार्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाचा दिव्यांगजन सबलीकरण विभाग 3 डिसेंबर 2021 रोजी व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य/जिल्हा इत्यादींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतो.
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777321)
Visitor Counter : 261