भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय निवडणूक आयोगाद्वारे (ईसीआय) सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेचे आयोजन

Posted On: 23 NOV 2021 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

 

भारतीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत एक परिषद आयोजित केली होती. मतदारयादी, मतदान केंद्रे, विशेष सारांश पुनरावलोकन, माहिती तंत्रज्ञान (आयटी) ऍप्लिकेशन्स, तक्रारींचे वेळेवर निराकरण, ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी, मतदान कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, प्रसारमाध्यमे आणि संवाद तसेच मतदारांपर्यंत पोहचण्याचा व्यापक कार्यक्रम यासंबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा आणि पुनरावलोकन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), राज्यांमध्ये आयोगाचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे सीईओंच्या परिणामकारकता आणि दृश्यमानतेच्या महत्त्वावर, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) सुशील चंद्रा यांनी आपल्या भाषणादरम्यान भर दिला.  त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मतदार यादीची शुद्धता, खात्रीशीर किमान सुविधांची उपलब्धता आणि सर्व मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर चांगल्या सुविधांची खातरजमा करण्यास सांगितले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विशेषत: मतदार नोंदणीसंदर्भात प्रलंबित असलेले सर्व अर्जं त्वरित निकाली काढण्यास सांगितले. प्रत्यक्षात मतदारांना चांगला अनुभव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की राजकीय पक्षांच्या काही तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी सीईओंनी त्यांच्याशी नियमित संवाद साधला पाहिजे.

सीईसी सुशील चंद्रा यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, या परिषदेचे उद्दिष्ट संपूर्ण देशातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये समान रीतीने आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित त्रूटी आणि आव्हाने हुडकणे हा आहे.

सीईओंद्वारे निवडणूकी संबंधित राबवले जाणारे नवीन उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धतींबाबत नियमितपणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित केल्या पाहिजेत. जेणेकरुन त्या अधिकाअधिक लोकांपर्यत पोहचतील यावर सीईसी यांनी भर दिला.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवोन्मेषी, अधिक सक्रिय असण्याची गरज आहे आणि एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती तसेच आव्हानांमधून शिकले पाहिजे यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधताना भर दिला.

निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) प्रशिक्षण आणि क्षमता निर्माणावर भर दिला. कारण ईसीआयच्या उपक्रमांची परिणामकारकता क्षेत्रस्तरीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असते.

परिषदेदरम्यान आयोगाने काल ‘निवडणूक कायद्यावरील प्रकरणांचे संकलन’ प्रसिद्ध केले.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे छायाचित्र मतदार यादी 2022 (SSR2022) च्या विशेष सारांश पुनरावृत्तीसाठी SVEEP उपक्रमांचे मल्टीमीडिया प्रदर्शन देखील परिषदेदरम्यान प्रदर्शित करण्यात आले. विविध दृक् श्राव्य, मुद्रीत जाहिराती आणि SSR 2022 साठी राज्यातील प्रख्यात (आदर्श) व्यक्तींचे संदेश राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झाले होते.

परिषदेला सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी, वरिष्ठ डीईसी, डीसीई, महासंचालक आणि आयोगातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774274) Visitor Counter : 299