पंतप्रधान कार्यालय
स्वदेशी बनावटीच्या विशाखापट्टणम विनाशिकेच्या नौदलाच्या ताफ्यातल्या समावेशाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
21 NOV 2021 11:09PM by PIB Mumbai
स्वदेशी बनावटीच्या विशाखापट्टणम विनाशिकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरणाचे प्रयत्न जोमाने सुरूच राहतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
‘संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची कास धरलेल्या भारतासाठी आजचा दिवस हा अभिमानाचा दिवस आहे. आयएनएस विशाखापट्टणमचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे ! ही विनाशिका स्वदेशात विकसित करण्यात आली असून यामुळे आपली सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरणाचे प्रयत्न जोमाने सुरूच राहतील, असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
****
STupe/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1773900)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam