पंतप्रधान कार्यालय
82 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद संमेलनाच्या उद्घाटन सत्राला येत्या 17 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान करणार संबोधित
Posted On:
15 NOV 2021 9:39PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता 82 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद संमेलनाच्या उद्घाटन सत्रात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण देणार आहेत.
एआयपीओसी म्हणजे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद म्हणजे भारतातील कायदेमंडळांची शीर्ष संस्था असून 2021 मध्ये तिची शताब्दी साजरी होत आहे. संस्थेच्या शताब्दीनिमित्त 17 आणि 18 नोव्हेंबर 2021 या दिवशी शिमला येथे ब्याऐंशीव्या एआयपीओसी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे पहिले संमेलनही 1921 मध्ये शिमल्यातच भरले होते.
लोकसभेचे अध्यक्ष, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपसभापती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
***
R.Aghor/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772146)
Visitor Counter : 276
Read this release in:
Tamil
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam