युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
स्पर्धेत पात्र ठरण्याची अधिक संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी, 'फिट इंडिया प्रश्नमंजूषा- 2021' मध्ये दोन प्राथमिक फेऱ्या होणार
Posted On:
15 NOV 2021 6:43PM by PIB Mumbai
प्रमुख वैशिष्ट्ये-
• प्राथमिक फेऱ्यांचे विजेते डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय फेरीत भाग घेतील.
• राज्यस्तरीय फेरीचे विजेते 2022 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेतील.
यावर्षी याआधी जाहीर झालेली 'फिट इंडिया प्रशमंजूषा' स्पर्धा आता दोन प्राथमिक फेऱ्यांमध्ये होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एका किंवा दोन्ही वेळां भाग घेऊन पुढे येण्याची अधिक संधी मिळू शकेल.
दोन प्राथमिक फेऱ्यांनंतर त्या दोन्ही चाचण्यांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यामध्ये असतील. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही प्राथमिक फेऱ्यांमध्ये भाग घेतला असेल, त्यांचे त्या दोहोंपैकी अधिक गुण निवडीसाठी ग्राह्य धरले जातील.
दुसऱ्या प्राथमिक फेरीचा दिनांक आणि वेळ लवकरच घोषित करण्यात येईल.
प्राथमिक फेऱ्यांचे विजेते डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय फेरीत भाग घेतील आणि राज्यस्तरीय फेरीचे विजेते 2022 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेतील.
प्रत्येक पातळीवरील विजेत्यांना, 'भारताच्या पहिल्या फिट इंडिया प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या राज्य/राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपदाच्या' गौरवाबरोबरच, रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिकेही प्राप्त होतील.
भारताच्या समृद्ध क्रीडा-इतिहासाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे, भारतातील शेकडो वर्षांपासूनच्या एतद्देशीय क्रीडाप्रकारांची त्यांना माहिती देणे, तसेच क्रीडाक्षेत्रातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक नायक-नायिकांविषयी- आपल्या महान खेळाडूंविषयी- ज्ञान देणे, असा या प्रश्नमंजूषेचा उद्देश आहे.
***
Jaydevi PS/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772060)
Visitor Counter : 231