अर्थ मंत्रालय

19 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्य अनुदानापोटी 8453.92 कोटी रुपयांचे वितरण- महाराष्ट्राला सुमारे 778 कोटी रुपयांचे अनुदान


प्राथमिक आरोग्य सेवा स्तरावरील आरोग्य सेवा प्रणालीमधील कमतरता दूर करण्याचा आणि आरोग्य प्रणाली बळकट करण्याचा अनुदानाचा उद्देश

Posted On: 13 NOV 2021 8:48AM by PIB Mumbai

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 19 राज्यांमधील  शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8453.92 कोटी रुपयाचे आरोग्य अनुदान वितरीत केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार हे अनुदान या राज्यांकडे पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्राला  778 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळाले  आहे.

 

पंधराव्या वित्त आयोगाने 2021-22 ते 2025-26 या काळासाठी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्थानिक शासनांना एकूण 4,27,911 कोटी रुपये देण्याची शिफारस केली होती. यामध्ये 70,051 कोटी रुपयाच्या आरोग्य अनुदानाचा समावेश आहे. यापैकी 43,928 कोटी रुपये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि 26,123 कोटी रुपये शहरीस्थानिक  स्वराज्य संस्थांसाठी आहेत.

 

प्राथमिक आरोग्य सेवा स्तरावर आरोग्य सेवा प्रणालीतील महत्त्वाच्या त्रुटी दूर करणे आणि आरोग्य प्रणाली बळकट करणे हा या अनुदानाचा उद्देश आहे. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातील प्राथमिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर उपाययोजना देखील आयोगाने विचारात घेतल्या आहेत आणि त्या प्रत्येक योजनेसाठी निधी राखून ठेवला आहे.

 

या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेतः

 

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सुविधांमध्ये  निदानविषयक पायाभूत सुविधांना पाठबळ देण्यासाठी– रु.16,377 कोटी

 

ग्रामीण भागात तालुका पातळीवर आरोग्य संस्था – रु.5,279 कोटी

 

इमारतविरहीत उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे,सीएचसींसाठी इमारतींचे बांधकाम – रु. 7,167 कोटी

 

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे आरोग्य आणि निरामय  केंद्रांमध्ये रुपांतर करणे – रु.15,105 कोटी

 

शहरी भागात प्राथमिक आरोग्य सुविधांमध्ये निदानविषयक पायाभूत सुविधांना पाठबळ– रु.2,095 कोटी

 

 शहरी आरोग्य आणि निरामय केंद्रे (HWCs) – रु.24,028 कोटी

 

 2021-22 या वर्षात रु.13,192 कोटी आरोग्य अनुदान देण्याची शिफारस. यापैकी 8,273 कोटी रुपये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि 4,919 कोटी रुपये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहेत.

 

प्राथमिक आरोग्य सेवा योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यामध्ये आणि सार्वत्रिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये शहरी आणि ग्रामीण स्थानिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. संसाधने, आरोग्य पायाभूत सुविधा आणि क्षमता उभारणीच्या माध्यमातून स्थानिक संस्थांना बळकटी देण्यामुळे साथींचा आणि महामारीचा फैलाव या दोहोंना प्रतिबंध करण्यासाठी या संस्था सक्षम बनू शकतील.

 

प्राथमिक आरोग्य सेवा संस्थांवर देखरेख ठेवणाऱ्या संस्था म्हणून पंचायती राज संस्थांना आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी केल्यामुळे एकंदर प्राथमिक आरोग्य सेवा प्रणाली अतिशय मजबूत होईल आणि स्थानिक शासनांच्या सहभागामुळे आरोग्य प्रणाली लोकांसाठी उत्तरदायी बनेल.

 

उर्वरित 9 राज्यांसाठी संबंधित राज्यांकडून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रस्ताव आल्यानंतर आरोग्य अनुदान दिले जाईल .

 

या अनुदानाचा राज्यनिहाय तपशील खालीलप्रमाणेःTable

 

S.No.

State

Amount of Grant released

(Rs. In crore)

1.

Andhra Pradesh

488.1527

2.

Arunachal Pradesh

46.944

3.

Assam

272.2509

4.

Bihar

1116.3054

5.

Chhattisgarh

338.7944

6.

Himachal Pradesh

98.0099

7.

JKharkhand

444.3983

8.

Karnataka

551.53

9.

Madhya Pradesh

922.7992

10.

Maharashtra

778.0069

11.

Manipur

42.8771

12.

Mizoram

31.19

13.

Odisha

461.7673

14.

Punjab

399.6558

15.

Rajasthan

656.171

16.

Sikkim

20.978

17.

Tamil Nadu

805.928

18.

Uttarakhand

150.0965

19.

West Bengal

828.0694

 

Total

8453.9248

***

Jaydevi PS/ S Patil/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771418) Visitor Counter : 219