पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रिझर्व बँकेच्या ग्राहक केन्द्री दोन अभिनव योजनांचा पंतप्रधान 12 नोव्हेंबरला करणार प्रारंभ

Posted On: 11 NOV 2021 10:18AM by PIB Mumbai

तप्रधान नरेंद्र मोदी, रिझर्व बँकेच्या ग्राहक केन्द्री दोन अभिनव योजनांचा 12 नोव्हेंबर 2021 ला सकाळी 11 वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे प्रारंभ करणार आहेत. आरबीआय  रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व बँक- एकात्मिक लोकपाल योजना या दोन योजनांचा उद्या प्रारंभ होणार आहे.

 

 किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी रोखे बाजारात व्यापक प्रवेश शक्य व्हावा हा आरबीआय  रिटेल डायरेक्ट योजनेचा उद्देश आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या रोख्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करण्याची नवी संधी या योजनेद्वारे प्राप्त होणार आहे. गुंतवणूकदार, आरबीआय समवेत  सुलभपणे आणि मोफत त्यांचे सरकारी रोखे खाते ऑनलाईन उघडू शकतील.

 

रिझर्व बँकेकडून नियमन केल्या जाणाऱ्या संस्थाविरुद्धच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची यंत्रणा सुधारण्याचा , रिझर्व बँक – एकात्मिक लोकपाल योजनेचा उद्देश आहे. ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एक राष्ट्र-एक लोकपाल’ या मध्यवर्ती संकल्पनेसह एक पोर्टल,एक ई मेल आणि एकच पत्ता यावर ही योजना आधारित आहे. ग्राहक  एकाच ठिकाणी त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतील, दस्तावेज सादर करू शकतील, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतील आणि प्रतिसादही देऊ शकतील. बहु भाषी निःशुल्क क्रमांकावर, तक्रार निवारणासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी सहाय्य आणि संबंधित माहिती दिली जाईल.

 

केंद्रीय वित्त मंत्री आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

***

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1770909) Visitor Counter : 438