कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून 8 ते 14 नोव्हेंबर 2021 या सप्ताहात न्याय विभागातर्फे टेली लॉ ऑन व्हील्स मोहीम

Posted On: 08 NOV 2021 6:18PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून  न्याय विभागाने टेली- लॉ ऑन व्हील्स ही मोहीम आठ ते 14 नोव्हेंबर 2021 या आठवड्यात आखली आहे.

नागरिकांना त्यांचे हक्क योग्य तऱ्हेने बजावता यावेत तसेच त्यांच्या अडचणींचे वेळेवर निवारण व्हावे यासाठी   खटला  प्रक्रियेपूर्वीचा सल्ला उपलब्ध करून देऊन , त्यांना कायदेशीर प्रक्रिया अवलंबण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी या मोहिमेत अनेक कार्यक्रम आखले आहेत.

गरजूना कायदेविषयक सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी विशेष लॉगीन सप्ताह देशभरात आयोजित करण्यात आला आहे याशिवाय दूरध्वनी वरून आणि दूरदृश्य प्रणालीमार्फत सल्लामसलतीच्या सुविधेचा  लाभ घेण्यासाठी टेली लॉ सर्विस असणाऱ्या म्हणजेच दूरध्वनीमार्फत कायदा सेवा देणाऱ्या  सर्वसाधारण सेवाकेंद्रास भेट देण्याची सूचना केली आहे.

या सर्वसाधारण सेवा केंद्रांना या कामासाठी कानूनी सलाह सहाय्यक केंद्र म्हणून नामाभिधान देण्यात येऊन त्यांचे ब्रँडिंग करण्यात आले आहे.

सर्वसाधारण सेवा केंद्र ई शासन च्या मदतीने टेली लॉ ऑन व्हील्स ही मोहीम चालवण्यात येत आहे.  'सर्वसाधारण सेवा केंद्र ई शासन' हे देशभरातील चार लाखांहून अधिक सर्वसाधारण डिजिटल सेवा केंद्रांचे जाळे आहे.

या मोहिमेचा संदेश झळकवणार्‍या विशेष मोबाईल व्हॅन जारी करण्यात आल्या असून न्याय विभागाच्या सचिवांनी पहिल्या व्हॅनला  न्याय विभागांच्या प्रांगणात हिरवा झेंडा दाखवला. या व्हॅन्स  दररोज 30 ते 40 किलोमीटर फिरून टेली लॉ बद्दलच्या माहितीपत्रकांचे वाटप , त्या संबंधीच्या माहिती पटांचे प्रसारण, रेडिओ जिंगल यामार्फत या मोहिमेचा प्रसार करतील.  त्याच बरोबर हिंदी आणि इंग्लिशमध्ये एसएमएस पाठवून गावकऱ्यांना त्यांच्या खटल्यात बद्दल किंवा कामाबद्दल माहिती तसेच कायदेशीर सल्ला घेण्यासाठी टेली लॉ प्रक्रियेमार्फत जाण्याचे महत्व सांगतील.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री तसेच केंद्रिय कायदा आणि न्याय राज्यमंत्री यांच्या हस्ते 13 नोव्हेंबर 2021 रोजी नागरिकांसाठी टेली लॉ मोबाईल ॲपचे उद्घाटन होईल. हे ॲप लाभार्थींना थेट पॅनेलवरील वकिलांशी संपर्क साधून कायदेशीर सल्ला आणि सल्लामसलत करण्याची संधी उपलब्ध करून देईल. या अँड्रॉइड मोबाईलॲपचा शुभारंभ केल्यानंतर ते गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घेता येईल.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1770070) Visitor Counter : 219